ताज्या बातम्याराजकारणशैक्षणिकसामाजिक

विधान परिषद पदवीधर व शिक्षक निवडणूक जाहीर

विधानपरिषदेच्या ३ पदवीधर, २ शिक्षक मतदारसंघांसाठी निवडणूक जाहीर, मतदान अन् निकाल कधी ?

मुंबई (बारामती झटका)

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ३ पदवीधर आणि २ शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा झाली आहे. २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान होणार असून २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. निवडणूक आयोगाने या निवडणुकीचे संपूर्ण वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे.

निवडणुकीचे संपूर्ण वेळापत्रक
अधिसूचना जारी दि. २९ सप्टेंबर २०२६

उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख – दि. ६ ऑक्टोबर २०२६
अर्जांची छाननी – दि. ७ ऑक्टोबर २०२६
अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख – दि. ९ऑक्टोबर २०२६
मतदानाची तारीख व वेळ – दि. २३ ऑक्टोबर २०२६ (सकाळी ८ ते दुपारी ४)
मतमोजणी व निकाल – दि. २७ ऑक्टोबर २०२६

रिक्त झालेल्या जागा

  1. औरंगाबाद पदवीधर : सतीश भानुदास चव्हाण (राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवारांची राष्ट्रवादी / मविआ)
  2. पुणे पदवीधर: अरुण गणपती लाड (राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवारांची राष्ट्रवादी / मविआ)
  3. नागपूर पदवीधर: अभिजीत गोविंदराव वंजारी (काँग्रेस)
  4. अमरावती शिक्षक: किरण रामराव सरनाईक (शिवसेना – शिंदे गट)
  5. पुणे शिक्षक : जयंत दिनकर आसगावकर (काँग्रेस)

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button