ताज्या बातम्यासामाजिक

वेळापूर येथील श्रीमती शिलाताई काकासो कोडक यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन….

मराठा समन्वयक राहुल भैय्या कोडग यांना मातृषोक…

वेळापूर (बारामती झटका)

वेळापूर, ता. माळशिरस येथील श्रीमती शिलाताई काकासो कोडग यांचे वयाच्या 70 व्या वर्षी सोमवार दि. 28 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी पंढरपूर येथे उपचार घेत असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात मराठा समन्वयक श्री. राहुल भैया कोडग व श्री. अतुल कोडग अशी दोन मुले, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर मंगळवार दि. 29 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी आठ वाजता बोरगाव रोड, वेळापूर येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.

काकासो कोडग यांचे दुःखद निधन झाल्यानंतर शीलाताई यांनी पितृत्व व मातृत्वाची जबाबदारी सांभाळलेली होती. आपली मुलं, मुली, सुना, जावई, नातवंडे यांच्यावर अफाट प्रेम केलेले होते. त्यांचा स्वभाव मनमिळावू होता. त्या धार्मिक वृत्तीच्या होत्या. त्यांना मरणसुद्धा पंढरपूर येथे आले आहे.

त्यांच्या दुःखद निधनाने कोडग परिवार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. कोडग परिवार यांना दुःखातून सावरण्याचे ईश्वर बळ देवो व शीलाताई यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच बारामती झटका परिवार यांचे कडून भावपूर्ण आदरांजली आहे..

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button