शिक्षक कौस्तुभ गावडे मतदान केंद्रात भाजपचा गमजा गळ्यात घेऊन गेले, तसेच शिक्षक आमदार म्हणून विधान परिषदेत जाणार आणि गेले सुद्धा….

बारामती झटका वेब पोर्टलची बातमी तंतोतंत खरी ठरली…
अकलूज (बारामती झटका)
पुणे शिक्षक व पदवीधर मतदार संघाची निवडणूक चुरशीची व रंगतदार झालेली आहे. पुणे, सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिक्षक व पदवीधर मतदारांनी आपला पवित्र मतदानाचा हक्क बजावलेला आहे. सोलापूर जिल्ह्यात टॉपचे मतदान झाले आहे. शिक्षक 85.87% तर पदवीधर 62.78% मतदान झालेले आहे. शिक्षक उमेदवार कौस्तुभ मुरलीधर गावडे यांनी मतदान करतेवेळी गळ्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा गमजा परिधान करून आपले पवित्र मतदान केलेले आहे. त्यानंतर महाविकास आघाडीच्या फाजील व वाचाळवीरांनी टिकेची झोड उडवलेली आहे. यावर भाजप व महायुतीच्या कार्यकर्त्यांमधून शिक्षक कौस्तुभ मुरलीधर गावडे यांनी मतदान केंद्रात भाजपचा गमजा गळ्यात घेऊन गेले, तसेच शिक्षक आमदार म्हणून विधान परिषदेत जाणार असल्याचे खात्रीलायक असल्याचे बोलले जात होते. तशी बातमी बारामती झटका वेब पोर्टल यांनी केलेली होती, ती तंतोतंत खरी ठरली…
शिक्षक मतदार संघात भाजप व महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. कौस्तुभ मुरलीधर गावडे, राष्ट्रवादी काँग्रेस व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार जयंत आसगावकर, शिंदे सेनेचे सानप, अपक्ष दत्तात्रय सावंत यांच्यासह 30 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते.

भाजप महायुतीचे कौस्तुभ गावडे शिक्षक उमेदवार कोल्हापूर जिल्ह्यातील जरी असतील तरी सोलापूर जिल्हा मतदानामध्ये पुढे असण्याचे कारण राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी लावलेली जोरदार फील्डिंग होय. सोलापूर जिल्ह्यातील अकरा तालुक्यांमध्ये माळशिरस तालुक्यात भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस तथा माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांनी मोहिते पाटील यांना शह देण्याकरता निवडणूक सुरू झाल्यापासून तालुक्यामध्ये रणनीती आखलेली होती. जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचा व महायुतीचा कार्यकर्ता एकदिलाने मतदारांपर्यंत पोहचून उमेदवारांचा अजेंडा व भविष्यामध्ये काय काम करणार याचा लेखाजोखा मतदारांसमोर मांडत होते. तर दुसरीकडे राष्ट्रवादी व महाविकास आघाडीचे नेते व कार्यकर्ते मतदारांपर्यंत न पोहोचता सोशल मीडियावर विजयाच्या गप्पा मारत होते. परंतु भाजप व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी पुणे शिक्षक मतदार संघाचे मैदान मारले आहे.
शिक्षक कौस्तुभ गावडे मतदान केंद्रात भाजपचा गमजा गळ्यात घेऊन गेले तसेच शिक्षक आमदार म्हणून विधान परिषदेत गेलेले असल्याने भाजप व महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये समाधानाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे…
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



