ताज्या बातम्यासामाजिक

श्री. दादासाहेब कांबळे यांची खाजगी सचिव (PS) म्हणून नियुक्ती; बोराटवाडी येथे ना. जयकुमार गोरे यांच्या हस्ते सत्कार!

बोराटवाडी (बारामती झटका)

महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे उर्फ जयाभाऊ यांचे विशेष कार्य अधिकारी (OSD) म्हणून कार्यरत असलेले दादासाहेब कांबळे यांची मंत्री ना. जयकुमार गोरे यांचे ग्रामविकास विभागाचे खाजगी सचिव (PS) म्हणून नियुक्ती झाली आहे. ही त्यांच्या प्रशासकीय अनुभवाची, कार्यक्षमतेची आणि कर्तृत्वाची पावती आहे.

उपजिल्हाधिकारी ते विशेष कार्य अधिकारी (OSD) आणि आता खाजगी सचिव (PS) असा त्यांचा प्रशासकीय प्रवास निश्चितच कौतुकास्पद आहे. आपल्या बुद्धिमत्तेने, प्रामाणिकपणाने आणि प्रशासकीय कौशल्याने त्यांनी प्रत्येक जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे. आज बोराटवाडी येथे ना. जयकुमार गोरे यांच्या हस्ते दादासाहेब कांबळे यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

याप्रसंगी आमदार धैर्यशील कदम, नामदार जयकुमार गोरे यांचे OSD तथा स्वीय सहाय्यक विकास गारळे, स्वीय सहाय्यक अभिजित काळे, सर्व कर्मचारी तसेच ग्रामविकास विभागातील अधिकारी उपस्थित होते.

श्री. दादासाहेब कांबळे साहेब यांचे नेहमीच मार्गदर्शन मिळत आहे. यांच्या प्रशासकीय अनुभवाचा आणि कार्यक्षमतेचा उपयोग नामदार जयकुमार गोरे (भाऊ) यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याच्या ग्रामविकासाला अधिक गती देण्यासाठी निश्चितच होईल. त्यांच्या नव्या जबाबदारीतून ग्रामीण विकासाच्या कार्याला अधिक बळ मिळो, हीच मनःपूर्वक सदिच्छा!

बारामती झटका परीवाराच्या वतीने दादासाहेब कांबळे साहेब, आपले मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील यशस्वी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! 💐

#दादासाहेबकांबळे #OSD #नियुक्ती_अभिनंदन #ग्रामविकासविभाग #जयकुमारगोरेभाऊ #MaharashtraGovernment #RuralDevelopment #TeamJaykumarGore

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button