आठ हजाराची लाच स्विकारताना पोलीस हवालदार ए.सी.बी.च्या जाळ्यात.
माळशिरस (बारामती झटका)
भावकीतील भांडणातील गुन्ह्यात सहकार्य करण्यासाठी व तक्रारदार याच्या पत्नीस अटक न करण्यासाठी आठ हजाराची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार दत्तात्रय बळीराम थोरात यास ए.सी.बी.ने रंगेहात पकडले.
याबाबत मिळालेली माहिती अशी कि, दोन भावामध्ये भांडणे झाली होती. यामध्ये दोघांनी एकमेकांविरोधात माळशिरस पोलिसात तक्रार दाखल केली होती. तक्रारदार व त्याचे भाऊ यांना सदर गुन्ह्यात अटके नंतर न्यायालयातून जामीन मिळाला होता. तक्रारदार यांच्या पत्नीस अटक न करण्यासाठी व दोषारोप पत्रात मदत करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडून तपास हवालदार थोरात यांनी दहा हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीनंतर ८ हजारात तडजोड झाली.
याबाबत तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याशी संपर्क साधला. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे व डॉ. शितल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक गणेश कुंभार, गणेश पिंगुवाले, पोलीस अंमलदार सायबन्ना कोळी, संतोष नरोटे, गजानन किणगी, चालक राहुल गायकवाड यांच्या पथकाने सापळा रचून थोरात यांना ८ हजाराची लाच स्विकारताना रंगेहात पकडले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.