अभाविप उमरगा शाखेतर्फे गुंजोटी येथे १११ फूट तिरंगा यात्रेचे आयोजन

गुंजोटी (बारामती झटका)
दि. १५ ऑगस्ट २०२६ स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, उमरगा शाखेच्या वतीने श्रीकृष्ण महाविद्यालय, गुंजोटी येथे १११ फूट तिरंगा पदयात्रेचे भव्य आयोजन करण्यात आले.
विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती, राष्ट्रीय एकात्मता आणि देशाप्रती असलेली जबाबदारी यांची भावना अधिक दृढ व्हावी, या उद्देशाने या तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेत विद्यार्थी, युवक, अभाविप कार्यकर्ते तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
तिरंगा यात्रा श्रीकृष्ण महाविद्यालय येथून सुरू होऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक, महात्मा बसवेश्वर चौक मार्गे पुन्हा श्रीकृष्ण महाविद्यालय येथे पोहोचली. संपूर्ण मार्गावर भारत माता की जय, वंदे मातरम् अशा घोषणांनी परिसर दुमदुमून निघाला. १११ फूट तिरंग्याच्या दर्शनाने नागरिकांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे लातूर विभाग संयोजक यश आरीकर, उमरगा शहर मंत्री समर्थ कुंभार तसेच अभिषेक मिसाळ, अजिंक्य चव्हाण विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देत विद्यार्थ्यांनी समाज आणि राष्ट्राच्या उभारणीत सक्रिय योगदान द्यावे, असा संदेश या तिरंगा पदयात्रेतून देण्यात आला.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



