ताज्या बातम्याराजकारण

ॲड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांची डॉ. आप्पासाहेब देशमुख यांच्या संपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट….

माळशिरस (बारामती झटका)

माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजीतसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्या धर्मपत्नी सातारा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या तथा स्वराज साखर कारखान्याच्या चेअरमन भाजपच्या ज्येष्ठ नेत्या ॲड. सौ. जिजामाला रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी भारतीय जनता पार्टीचे प्रांतिक सदस्य तथा माळशिरस नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष डॉ. आप्पासाहेब एकनाथ देशमुख यांच्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी चौक माळशिरस येथील संपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट दिली…

ॲड. सौ. जिजामाला रणजीतसिंह नाईक निंबाळकर माळशिरस तालुक्याच्या दौऱ्यावर आलेल्या होत्या‌. त्यावेळेस डॉ. आप्पासाहेब देशमुख यांच्या संपर्क कार्यालयाला आवर्जून भेट दिली. त्यांचा सन्मान डॉक्टर अप्पासाहेब देशमुख यांनी केला. यावेळी माजी उपनगराध्यक्ष विद्यमान सभापती तथा भारतीय जनता पार्टीचे अकलूज शहराध्यक्ष वैभवजी जानकर, ज्येष्ठ नगरसेवक दादासाहेब शिंदे, स्वीकृत नगरसेवक रावसाहेब देशमुख, धनाजी देवकर, दादासाहेब बोराटे, स्वराज कारखान्याचे शेतकी अधिकारी सचिन शेंडगे, पत्रकार तथा गीताचार्य संजय हुलगे, भाजप युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस स्वप्निलकुमार राऊत आदी उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या लोकसभा निवडणुकीत माळशिरस येथे जाहीर सभेचे चांगले नियोजन डॉक्टर आप्पासाहेब देशमुख यांनी केलेले होते. याची आठवण करून अनेक राजकीय घडामोडींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. माळशिरस तालुक्यात दिवसेंदिवस भारतीय जनता पार्टीची ताकद वाढत आहे. आपल्या सारख्या निष्ठावान व जनसंपर्क असलेल्या नेत्यांमुळे कार्यकर्त्यांच्या अडचणी सोडवत आहात. रणजीतदादा, जयाभाऊ आणि रामभाऊ यांच्या माध्यमातून तालुक्यात आजपर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात विकासाला निधी मिळालेला नव्हता. विकासकामांमुळे तालुक्यातील अनेक प्रश्न सुटलेले आहेत. अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला लोणंद फलटण पंढरपूर रेल्वे मार्ग, शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा असणारा निरा देवधर पाण्याचा प्रश्न लवकरच मिटणार आहे. अशा अनेक राजकीय विषयांवर सखोल चर्चा झाली.

डॉ. आप्पासाहेब देशमुख यांचे संपर्क कार्यालय पाहून ॲड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांनी समाधान व्यक्त केलेले आहे. कार्यालयात कार्यकर्त्यांना बसण्याची सुसज्ज व्यवस्था, मान्यवरांना स्वतंत्र दालन तयार करून भिंतीवरती पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, पालकमंत्री जयकुमार गोरे, पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, दमदार आमदार राम सातपुते यांचे फोटो लावलेले आहेत. कार्यालयात प्रवेश करताच ग्रामीण भागात आदर्श कार्यालय असून प्रेरणा घेण्यासारखे आहे..

सदर भेटीचे छायाचित्रण दिव्या फोटोग्राफी माळशिरस चे प्रोप्रायटर शशिकांत म्हमाणे यांनी केलेले आहे…

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button