बारामती तालुक्यात खरीप पिकांच्या पंचनाम्याला सुरुवात

३ हजार ९६६ खातेदारांच्या २ हजार २५२ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण
बारामती (बारामती झटका)
महाराष्ट्र शासनाच्या विस्तार व प्रशिक्षण विभाग, कृषी आयुक्तालयाच्या निर्देशानुसार सन २०२६-२७ मधील खरीप हंगामासाठी बारामती तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार तालुक्यातील ११९ गावांमध्ये खरीप हंगामातील पिकांचे पंचनामे करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
पंचनाम्याच्या कामासाठी तहसील कार्यालयातील ५६ ग्राम महसूल अधिकारी, तालुका कृषी कार्यालयातील ४३ सहायक कृषी अधिकारी तसेच पंचायत समिती बारामती कार्यालयातील ७० ग्रामपंचायत अधिकारी अशा एकूण १६९ अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
बारामती तालुक्यात खरीप हंगामातील आतापर्यंत ३ हजार ९६६ खातेदारांच्या २ हजार २५२ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे करण्यात आले आहेत. उर्वरित क्षेत्रातील पंचनाम्याचे कामही सुरू असून, शेतकऱ्यांनी आपल्या गावातील ग्राम महसूल अधिकारी, सहायक कृषी अधिकारी तसेच ग्रामपंचायत अधिकारी यांच्याशी संपर्क साधून पिकांचे पंचनामे करून घ्यावेत, असे आवाहन तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी केले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



