Uncategorizedताज्या बातम्यासामाजिक

भाजप अकलूज शहर अध्यक्ष महादेवराव कावळे यांच्यावर वाढदिवसानिमित्त विविध स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव….

महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे, माळशिरस विधानसभेचे माजी आमदार राम सातपुते यांच्यासह अनेक मान्यवर नेते, कार्यकर्ते, सर्वसामान्य जनता यांनी शुभेच्छा देऊन सन्मान केला…

अकलूज (बारामती झटका)

सर्वसामान्य व गोरगरीब जनतेचा तारणहार सर्व जाती धर्मातील लोकांना अडीअडचणीत मदत करून जनतेच्या मनावर अधिराज्य करणारा मनासारखा राजा, राजासारखे मन असणारे, दिलदार नेतृत्व, मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस, राजकारण करताना समाजकारण करून जनतेशी सामाजिक बांधिलकी जपुन दुसऱ्याच्या शेतामध्ये काबाडकष्ट करणाऱ्या लाडक्या बहिणींना विमानाने देवदर्शन करून सर्वांचा लाडका भाऊ ठरलेले, माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार मा. खासदार रणजीतसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर, महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश चिटणीस तथा माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार मा. आमदार राम सातपुते यांचे विश्वासू व भारतीय जनता पार्टीचे निष्ठावान अकलूज शहर अध्यक्ष महादेवराव कावळे उर्फ नाना यांच्यावर 04 जून रोजी वाढदिवसाला विविध स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव झालेला आहे.

महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे, भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस तथा माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्यासह अनेक मान्यवर नेते, कार्यकर्ते, सर्व जाती धर्मातील सर्वसामान्य जनता यांनी शुभेच्छांचा वर्षाव केलेला आहे…

अकलूज येथे विविध ठिकाणी विविध कार्यकर्त्यांनी महादेव नाना कावळे यांचा फेटा, हार व श्रीफळ देऊन केक कापून वाढदिवस साजरा केलेला आहे. शिवम अमृततुल्यचे मालक महेश थोरात यांनी लोकशाहीर साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासमोर महादेवनाना कावळे यांचा वाढदिवस साजरा करीत असताना अकलूज नगर परिषदेचे नगरसेवक राहुल लोंढे व युवा नेते संदीप पवार यांचाही वाढदिवस साजरा करण्यात आला. तिघांनाही फेटे व हार घालून फटाक्यांच्या आतीषबाजीत केक कापण्यात आला. यावेळी अनेक नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महादेव नाना कावळे गोरगरीब, सर्वसामान्य व गरजू रुग्णांना दररोज एक रक्ताची बाटली देत असतात. सदरच्या बाटलीचा खर्च स्वतः करीत असतात. अशा समाज उपयोगी कार्यक्रमाबरोबर वाढदिवसाला अनेक समाज उपयोगी कार्यक्रम राबवले जातात. वाढदिवसाच्या दिवशी कार्यक्रमाला सुरुवात केली जाते. समाज उपयोगी कार्यक्रमाचा सप्ताह आयोजित केला जातो. वाढदिवसादिवशी उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांना खाऊ वाटप केलेले आहे. गोरगरीब व गरजू महिलांना शिलाई मशीन वाटप, शालेय विद्यार्थिनींना सायकल वाटप, अल्पभूधारक व भूमिहीन लोकांना कडबा वाटप केला जातो, नादुरुस्त घर असणाऱ्या लोकांना पत्रे वाटप, सामाजिक समतोल राखण्याकरता वृक्षारोपण केले जाते, गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप असे वाढदिवसाला सामाजिक उपक्रम राबवले जातात. लाडक्या बहिणींना विमानाने बालाजी दर्शन घडवलेले आहे. अजून महिलांना विविध धार्मिक ठिकाणी विमानाने घेऊन जाण्याचा त्यांचा संकल्प आहे.

महादेव नाना कावळे यांचा स्वभाव मनमिळावू व सुसंस्कृत आहे. ते सर्वांना मिळून मिसळून घेत असतात. सर्वपक्षीय व सर्व जाती धर्मातील लोकांना सामावून घेत असल्याने सर्व स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झालेला आहे. सर्वसामान्य व गोरगरीब जनतेचा तारणहार महादेव नाना कावळे यांना बारामती झटका परिवार यांचेकडून लाख लाख शुभेच्छा…

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button