भाजपच्या महिला सोलापूर जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी सौ. ज्योतीताई पाटील यांची निवड करण्यात आली.

ज्योतीताई पाटील यांच्या कार्यकर्तृत्वातून ग्रामीण भागातील वाड्यावस्त्या व गावागावात कमळ फुलविण्यासाठी कार्यरत राहणार…
माळशिरस (बारामती झटका )
सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या व नियोजन समिती सदस्या सौ. ज्योतीताई पाटील यांची भारतीय जनता पक्षाच्या सोलापूर ग्रामीण जिल्हा महिला आघाडी जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. ज्योतीताई पाटील यांच्या कार्यकर्तृत्वातून ग्रामीण भागातील वाड्यावस्त्या व गावागावात भारतीय जनता पक्षाची ध्येयधोरणे रुजवून भाजपचे कमळ चिन्ह फुलविण्यासाठी कार्यरत राहणार असल्याचा विश्वास भाजपच्या गोटातून दिला जात आहे. सौ. ज्योतीताई पाटील यांच्या निवडीने माळशिरस, पंढरपूर, सांगोला, माढा, करमाळा या तालुक्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे.
ज्योतीताई पाटील यांचे सासर निमगाव मगराचे आहे. ज्येष्ठ नेते स्वर्गीय कृष्णाराव पाटील यांच्या घराण्यामधील संघर्षमय राजकीय जीवनाला सुरुवात करणारे कल्पक बुद्धी व उच्च विचारसरणी असणारे सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य व भारतीय जनता पक्षाचे सोलापूर जिल्हा सह प्रभारी व प्रांतिक सदस्य के. के. पाटील यांच्या धर्मपत्नी आहेत. सौ ज्योतीताई यांचे शालेय शिक्षण, कॉलेज बारामती येथे झालेले आहे. शिक्षणामध्ये अतिशय हुशार असल्याने त्यांचा प्रथम क्रमांक असत. त्यांनी बी. एस. सी. पूर्ण केलेले आहे. माहेर व सासरचा राजकीय वारसा आहे. केके पाटील यांनी माळशिरस पंचायत समितीचे सदस्य पदावर तीन टर्म काम केलेले आहे. आरक्षणामध्ये जिल्हा परिषद गट महिला राखीव झाल्यानंतर सौ. ज्योतीताई पाटील यांनी जिल्हा परिषद सदस्य पदावर काम केलेले आहे. जिल्हा परिषद सदस्य असताना अनेक प्रलंबित प्रश्नांना सभागृहांमध्ये वाचा फोडलेली आहे. ज्योतीताई यांनी कार्यातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेली होती. स्पष्ट व परखड वक्तव्य असल्याने समोरच्या व्यक्तींवर कामांचा प्रभाव पडतो.

अशा सुसंस्कृत असणाऱ्या ज्योतीताई यांचा राजकारणाबरोबर सामाजिक कार्यामध्येही सिंहाचा वाटा असतो. महिलांच्या उन्नतीसाठी अनेक कार्यक्रम करून महिलांची जनजागृती केलेली आहे. भाजपच्या नेत्या सौ. चित्राताई वाघ निमगाव येथे महिलांच्या कार्यक्रमासाठी आल्यानंतर ज्योतीताई यांनी केलेले कार्याचे नियोजन व कार्यक्रमाची रूपरेषा पाहून चित्राताई यांनी ज्योतीताई यांच्या अंगातील कौशल्य ओळखून भाजपचे वाड्यावस्त्यांवर व गावागावात जाळे विणण्याकरता ज्योतीताई यांची जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यासाठी आग्रही राहिल्या. सौ. ज्योतीताई पाटील यांना पती के. के. पाटील यांचा राजकीय अनुभव व स्वकर्तुत्वातून केलेली जनतेची व समाजाची सेवा यामुळे भाजपने टाकलेली सोलापूर ग्रामीण जिल्हा अध्यक्ष पदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळतील, असा विश्वास भाजपच्या गोटातून व्यक्त केला जात आहे. सौ. ज्योतीताई पाटील यांची निवड झाल्यापासून सोशल मीडिया, फेसबुक, ट्विटर व प्रत्यक्ष भेटून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng