संगीत विषारद ह. भ. प. सौ. वनिताताई पाटील, भिवंडी मुंबई यांचे गोरडवाडी येथे सुश्राव्य कीर्तन होणार.

गोरडवाडी गावचे प्रगतशील बागायत स्वर्गीय रामचंद्र गेना गोरड उर्फ तात्या यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन, पुष्पगुच्छ व महाप्रसादाचे आयोजन…
गोरडवाडी (बारामती झटका)
गोरडवाडी गावचे प्रगतशील बागायतदार स्वर्गीय रामचंद्र गेना गोरड उर्फ तात्या यांचे सोमवार दि. 18/09/2023 रोजी प्रथम पुण्यस्मरणानिमित्त संगीत विषारद ह. भ. प. सौ. वनिताताई प्रकाश पाटील मु. वडू-नवघर, ता. भिवंडी, जि. ठाणे (मुंबई) यांचे सुश्राव्य कीर्तन सकाळी 10 ते 12 या वेळेमध्ये होणार आहे. यावेळी कीर्तनानंतर पुष्पवृष्टी, आरती करून महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे.

तरी मित्रपरिवार व नातेवाईक यांनी उपस्थित रहावे असे, गोरडवाडी गावचे माजी सरपंच श्री. आबा रामचंद्र गोरड व समस्त गोरड परिवार यांच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng