माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत माळशिरस तालुका टंचाई आढावा बैठक संपन्न होणार…

माळशिरस (बारामती झटका)
माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत माळशिरस तालुक्यातील टंचाई आढावा बैठक शनिवार दि. 16 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी चार वाजता पंचायत समिती माळशिरस येथील सभागृहात प्रांताधिकारी नामदेव टिळेकर, तहसीलदार सुरेश शेजुळ, गटविकास अधिकारी विनायक गुळवे यांच्यासह विभाग प्रमुख व माळशिरस तालुक्यातील लोकप्रतिनिधी नेते व कार्यकर्ते यांची संयुक्त बैठक होणार आहे.
माळशिरस तालुक्यात पावसाने दिलेली ओढ व त्यामुळे निर्माण झालेली पाण्याची प्रचंड टंचाई, भविष्यात जनावरांचा चारा, शेती व पिण्याच्या पाण्याचा सतावणारा प्रश्न या नियोजनासाठी माढा लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी 14 सप्टेंबर पासून सलग तीन दिवस माढा मतदारसंघातील विविध तालुक्यात टंचाई आढावा बैठकीचे आयोजन केलेले आहे. यंदा पावसाने चांगलीच ओढ दिल्याने संपूर्ण माढा मतदारसंघात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याची सद्य परिस्थिती असून भविष्यात येणाऱ्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज असण्याची गरज आहे. यासाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी माढा मतदार संघात टंचाई आढावा बैठक घेऊन शनिवार दिनांक 16 सप्टेंबर 2023 रोजी माळशिरस तालुक्याच्या आढावा बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत. टंचाई बैठकीकडे नागरिकांचे लक्ष लागलेले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng