भांब येथे श्री शंभू महादेव मंदिराचा कलशारोहण सोहळ्याचे आयोजन

भांब (बारामती झटका)
भांब, ता. माळशिरस येथे श्री शंभू महादेव मंदिर कलशारोहण सोहळ्याचे आयोजन श्रीक्षेत्र संभाजी बाबा दरा बांधकाम समिती व सप्ताह समिती, ग्रामस्थ व भक्तगण भांब यांच्यावतीने भांब नजिक संभाजी बाबा दरा ता. माळशिरस येथे करण्यात आले आहे.
शनिवार दि. २३-०५-२०२६ रोजी दु. २.३० ते ५.३० वा. कलश मिरवणूक काढण्यात आली.
रविवार दि. २४-०५-२०२६ रोजी सकाळी ७ ते ९ वा. गणेश पूजन होमहवन, प्राणप्रतिष्ठापना, सकाळी ८ ते ९ वा. महाअभिषेक, सकाळी ९.३० वा. कलशारोहन समारंभ ह.भ.प. शिवाजी महाराज बोकारे, लातुर यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. तर यावेळी प्रमुख उपस्थिती ह.भ.प. भागवत महाराज शिरवळकर, पंढरपूर, ह.भ.प.गायकवाड महाराज, श्रीगोंदा, ह.भ.प. सोपानकाका काळे महाराज, मार्डी आदी मान्यवर असणार आहेत.

सकाळी १० ते १२ वा. महाआरती व किर्तन, दुपारी १२.३० वा. महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार दि. २३ मे २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वा. मोफत नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
तरी भांब परिसरातील व पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री क्षेत्र संभाजी बाबा दरा बांधकाम समिती व सप्ताह समिती ग्रामस्थ व भक्तगण यांच्यावतीने करण्यात आले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



