अकलूज नगर परिषद निवडणुकीत भावजयसाठी नणंद प्रचाराच्या रणांगणात, रणरणत्या उन्हातसुद्धा नातं जपलं जातंय…

राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, लहुजी शक्ती सेना युतीच्या अधिकृत उमेदवार सौ. उर्वशीराजे धवलसिंह मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ सौ. धनश्रीताई आदित्य राजे घुले पाटील प्रचारात आघाडीवर….
अकलूज (बारामती झटका)
अकलूज नगर परिषद चुरशीच्या व रंगतदार निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, लहुजी शक्ती सेना युतीच्या अधिकृत उमेदवार सौ. उर्वशीराजे धवलसिंह मोहिते पाटील व पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार देवयानी सुधीर रास्ते व प्रभागातील सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सौ. धनश्रीताई आदित्य राजे घुले पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. अकलूज नगर परिषद निवडणुकीत भावजयसाठी नणंद प्रचाराच्या रणांगणात रणरणत्या उन्हातसुद्धा नातं जपलं जात असल्याची, अकलूजच्या प्रचारामध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.
महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार राज्यमंत्री लोकनेते स्वर्गीय प्रतापसिंह शंकरराव मोहिते पाटील व सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी विरोधी पक्षनेत्या, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सिनेट सदस्या पद्मजादेवी प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या विचाराने व संस्काराने धनश्रीताई व धवलदादा यांची जडणघडण झालेली आहे. लहानपणापासून घरातील संस्कार घेऊन धवलदादांची वाटचाल सुरू आहे. अकलूज नगर परिषद निवडणुकीत महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेच्या माध्यमातून राजकीय रणनीती सुरू होती. नगरपरिषदेच्या निवडणुकीत पद्मजादेवी मोहिते पाटील व उर्वशीराजे मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सोलापूर जिल्हा अध्यक्ष उमेशदादा पाटील, ज्येष्ठ नेते सुरेशआबा पालवे पाटील यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केलेला होता.

अकलूज नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष व 26 नगरसेवक पदाचे उमेदवार अर्ज भरलेले होते. अर्जाच्या छाननीच्या वेळी निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे अनेकांचे उमेदवारी अर्ज तांत्रिक बाबीने बाद झाले. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चार अर्ज बाद झालेले असल्याने उर्वशीराजे धवलसिंह मोहिते पाटील यांना चार ठिकाणी उमेदवारी अर्ज ठेवावा लागलेला आहे. त्यामुळे चारी प्रभागात सर्व मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे. धनश्रीताई व उर्वशीराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत अकलूज शहर आरपीआय व लहुजी शक्ती सेना यांनी जाहीर पाठिंबा दिलेला आहे. सध्या अकलूज नगर परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला आहे. आई-वडिलांचे संस्कार घेऊन धनश्रीताई यांनी सासर माहेरमध्ये सांगड घातलेली आहे. भावजय उर्वशीराजे निवडणुकीत उभे आहेत. त्यांच्या प्रचारार्थ सोबत फिरत आहेत.
समाजामध्ये आपण पाहतो नणंद-भाऊजय मध्ये कधीही आनंद नसतो मात्र, नणंद भावजयच्या नात्याला उंच शिखरावर नेऊन ठेवण्याचे काम धनश्रीताई व उर्वशीराजे उर्फ वहिनी यांनी केलेले आहे. सध्या रणरणते ऊन आहे, तरीसुद्धा उन्हाची परवा न करता नणंद व भावजय मतदारांपर्यंत पोहचून भविष्यामध्ये मतदारांसाठी कशा पद्धतीने कार्य केले जाईल, असा प्रचार सुरू आहे. नगरपरिषद निवडणुकीत राजकीय पक्षांकडून कसाही प्रचार केला तरी सुद्धा नणंद-भावजयच्या नात्याच्या हिंदू संस्कृतीचे दर्शन घडलेले अकलूजकर पहात आहेत..
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



