ब्रेकिंग : अतुल कुलकर्णी सोलापूरचे नवे पोलीस अधीक्षक; शिरीष सरदेशपांडे अँटी करप्शन ब्यूरोकडे
सोलापूर (बारामती झटका)
राज्याच्या गृह विभागाने भा.पो.से., रा.पो.से. अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले असून त्यात २९ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांची बदली पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक म्हणून झाली आहे. तर धाराशिवचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची बदली सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक म्हणून झाली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या गृह विभागाने हे बदल्यांचे आदेश काढले आहेत. तत्कालीन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या बदलीनंतर 22 ऑक्टोबर 2022 रोजी सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक पदी शिरीष सरदेशपांडे यांची नियुक्ती झाली होती. सोलापूरचे नवे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी हे 2015 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.