चि. आदित्य वाघमोडे ६० फाटा, माळशिरस आणि चि. सौ. कां. मोनाली मासाळ, पिलीव यांचा शाही शुभ विवाह सोहळा होणार संपन्न

कै. विश्वास वाघमोडे ६० फाटा, माळशिरस आणि श्री. विठ्ठल मासाळ यांचे ऋणानुबंध रेशीमगाठीत बांधले जाणार
माळशिरस (बारामती झटका)
कै. विश्वास तुळशीराम वाघमोडे रा. ६० फाटा, माळशिरस, ता. माळशिरस यांचे द्वितीय सुपुत्र चि. आदित्य आणि श्री. विठ्ठल कुशाबा मासाळ रा. पिलीव, ता. माळशिरस यांची सुकन्या चि. सौ. कां. मोनाली यांचा शाही शुभ विवाह सोहळा गुरुवार दि. ३०/०४/२०२६ रोजी दुपारी १२ वा. ४५ मि. या शुभ मुहूर्तावर मातोश्री मंगल कार्यालय, विझोरी चौंडेश्वरवाडी, शिवामृत अकलूज रोड, ता. माळशिरस येथे संपन्न होणार आहे.
सुर सनईच्या मधुर नादाने, ढोल ताशांच्या गजरात, आप्तस्नेही नात्याच्या सानिध्यात, उत्साही, आनंदी, मंगल वातावरणात, आशीर्वादाची भरभरून, ओंजळ वधू-वरांवर बरसात करण्यासाठीच, सहकुटुंब सहपरिवार अगत्य यावे, हेच वाघमोडे परिवाराच्या वतीने स्नेहाचे आमंत्रण.

लग्नाच्या घाईगडबडीत नजरचुकीने आपणांस आमंत्रण निमंत्रण द्यायचे राहून गेले असल्यास हेच आमंत्रण समजून उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त वाघमोडे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



