ह. भ. प. वैभव महाराज निंबाळकर पंधरा वस्ती, वडापुरी यांचे गिरझणी येथे सुश्राव्य कीर्तन होणार…

वीर शहीद जवान कै. लक्ष्मण पवार यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन
गिरझणी (बारामती झटका)
वीर शहीद जवान कै. लक्ष्मण संजय पवार यांच्या प्रथम पुण्यस्मरणाचे आयोजन शनिवार दि. २/५/२०२६ रोजी ईलाक्षीदेवी नगर, स्वामी समर्थ मंदिरासमोर, गिरझणी, ता. माळशिरस येथे करण्यात आले आहे. यावेळी प्रथम पुण्यस्मरणानिमित्त ह. भ. प. वैभव महाराज निंबाळकर पंधरा वस्ती, वडापुरी यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कीर्तनानंतर आरती, पुष्टवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले आहे. तरी या पुण्यस्मरण सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन ईलाक्षीदेवी नगर व समस्त ग्रामस्थ गिरझणी यांच्यावतीने करण्यात आले आहे.

नजरचुकीने आपणांस आमंत्रण द्यायचे राहून गेले असल्यास हेच आमंत्रण समजून उपस्थित राहण्याचे आवाहन ईलाक्षीदेवी नगर व समस्त ग्रामस्थ गिरझणी यांच्या वतीने करण्यात आली आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



