चि. सौ. कां. अमृता पिसे, नातेपुते आणि चि. कुर्मदास धालपे, बारामती यांचा शाही शुभ विवाह सोहळा होणार संपन्न

श्री. दिलीप बाबुराव पिसे, नातेपुते आणि चि. अभिषेक दिलीप पिसे यांच्यावतीने उपस्थित राहण्याचे आवाहन…
नातेपुते (बारामती झटका)
कै. श्री. बाबुराव मुगटराव पिसे यांची नात व सौ. लक्ष्मी व श्री. दिलीप बाबुराव पिसे, मु. पो. नातेपुते, ता. माळशिरस यांची कन्या चि. सौ. कां. अमृता आणि श्री. भारत गोविंद धालपे यांचे नातू व सौ. सुनिता व श्री. सतीश भारत धालपे, मु. पो. बारामती, ता. बारामती यांचे सुपुत्र चि. कूर्मदास यांच्या शाही शुभ विवाह सोहळ्याचे आयोजन गुरुवार दि. ३०/४/२०२६ रोजी दुपारी २ वा. ६ मि. या शुभमुहूर्तावर राज आनंद मंगल कार्यालय, दहिगाव रोड, नातेपुते येथे करण्यात आले आहे. तरी नव जीवनात पदार्पण करणाऱ्या दांपत्याला अक्षतारूपी आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन श्री. दिलीप बाबुराव पिसे आणि चि. अभिषेक दिलीप पिसे यांच्यावतीने करण्यात आले आहे.


लग्नाच्या घाईगडबडीत नजरचुकीने आपणांस आमंत्रण द्यायचे राहून गेले असल्यास हेच आमंत्रण समजून उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त पिसे परीवाराच्यावतीने करण्यात आले आहे.



नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



