चि. शिवांश केसकर याचा पाचवा वाढदिवस व भव्य सत्कार समारंभाचे आयोजन

मा. आमदार रामभाऊ सातपुते व भाजपचे गटनेते दत्तात्रय शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार संपन्न
डोंबाळवाडी (बारामती झटका)
डोंबाळवाडी, ता. माळशिरस येथील भाजपचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष डोंबाळवाडीचे माजी सरपंच विशेष कार्यकारी अधिकारी श्री. महादेव दादासो केसकर यांचे नातू चि. शिवांश याचा पाचवा वाढदिवस व भव्य सत्कार समारंभाचे आयोजन बुधवार दि. १३/५/२०२६ रोजी सायंकाळी ६.३० वा. श्रीनाथ मंदिर शेजारी, डोंबाळवाडी (कु.), ता. माळशिरस येथे आयोजित करण्यात आले आहे.

यावेळी प्रमुख उपस्थितीत भाजपा युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव लोकप्रिय दमदार माजी आमदार रामभाऊ विठ्ठल सातपुते, माळशिरस पंचायत समितीचे भाजपाचे गट नेते श्री. दत्तात्रेय विठोबा शेळके, माळशिरस तालुक्यातील भाजपचे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, मंडळ अध्यक्ष, शहराध्यक्ष, इतर पदाधिकारी यांच्यासह अनेक उपस्थित असणार आहेत.

तरी या वाढदिवस व भव्य सत्कार समारंभ उपस्थित राहण्याचे आवाहन भाजपाचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष, माजी सरपंच डोंबाळवाडी, विशेष कार्यकारी अधिकारी श्री. महादेव दादासो केसकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



