ताज्या बातम्याराजकारण

युवासेना माळशिरस विधानसभा संपर्क प्रमुख पदी विजय कोकणे यांची वर्णी

अकलूज (बारामती झटका)

वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत, शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेच्या संघटनात्मक बांधणीला वेग देण्यात येत आहे.

युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश परिषा प्रताप सरनाईक यांच्या विनंतीनुसार S.I.R. प्रक्रिया, मतदार यादी प्रक्रिया प्रभावीपणे राबविणे तसेच युवासेना सदस्य नोंदणी अभियान अधिक व्यापक करण्यासाठी राज्यभरात विधानसभा संपर्कप्रमुख पदांवर नियुक्त्या करण्यात येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर युवासेना महाराष्ट्र राज्य सचिव किरण साळी व युवासेना मुख्य सचिव राहुल लोंढे यांच्या आदेशानुसार युवासेना मध्यवर्ती कार्यालय, ठाणे येथून माढा लोकसभा संपर्कप्रमुख सुजितजी खुर्द यांच्या वतीने विजय भाऊ कोकणे यांची युवासेना माळशिरस विधानसभा संपर्कप्रमुख पदी नियुक्ती जाहीर करण्यात आली.

या निवडीमुळे माळशिरस तालुक्यातील युवासेना संघटनाला नवी ऊर्जा मिळणार असल्याची भावना कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे. विजय भाऊ कोकणे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “युवकांच्या प्रश्नांवर आक्रमकपणे काम करत ग्रामीण भागात युवासेनेचे मजबूत जाळे उभे करणार आहे. बूथ लेव्हलपर्यंत पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करून संघटन अधिक सक्षम करण्यावर भर राहील.”

दरम्यान, त्यांच्या निवडीची घोषणा होताच सोलापूर जिल्हाभरातील कार्यकर्ते, समर्थक व चाहत्यांकडून जल्लोष साजरा करण्यात आला. विविध ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी, पेढे वाटप व सत्कार समारंभांचे आयोजन करण्यात आले. अकलूज येथे विजय भाऊ कोकणे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी पक्षाचे पदाधिकारी, युवासैनिक, कार्यकर्ते व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button