ताज्या बातम्यासामाजिक

चि. शिवेंद्रसिंह हुंबे भोसले, हनुमानवाडी आणि चि. सौ. कां. नम्रता पाटील, तुंगत यांचा शाही शुभ विवाह सोहळा होणार संपन्न

श्री. विनोद हुंबे भोसले आणि श्री. रामेश्वर पाटील यांचे ऋणानुबंध रेशीमगाठीत बांधले जाणार

माळशिरस (बारामती झटका)

कै. शिवाजी बाळू हुंबे भोसले यांचे नातू व श्री. विनोद शिवाजी हुंबे भोसले रा. हनुमानवाडी, ता. माळशिरस यांचे ज्येष्ठ सुपुत्र चि. शिवेंद्रसिंह आणि कै. अनंतराव विश्वंभर पाटील यांची नात व श्री. रामेश्वर अनंतराव पाटील रा. तुंगत, ता. पंढरपूर यांची सुकन्या चि. सौ. कांं. नम्रता यांचा शाही शुभ विवाह सोहळा शनिवार दि. ९/५/२०२६ रोजी सायंकाळी ६ वाजून ४६ मि. श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालय, नातेपुते-फलटण रोड, धर्मपुरी बंगला, ता. माळशिरस येथे संपन्न होणार आहे.

वैवाहिक जीवनाची सुरुवात करण्यास निघालेल्या नवदांपत्यास अक्षतारुपी शुभ आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन आपले नम्र श्री. गोरख गणपत हुंबे भोसले, श्री. विनोद शिवाजी हुंबे भोसले यांच्या वतीने करण्यात आले आहे.

लग्नाच्या घाईगडबडीत नजरचुकीने आपणांस आमंत्रण द्यायचे राहून गेले असल्यास हेच आमंत्रण समजून उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त हुंबे भोसले परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button