नातेपुते पोलिसांची दबंग कामगिरी; 3,00,000/- रुपये किंमतीचे 14 गहाळ मोबाईल मूळ मालकांना केले हस्तांतरित.

नातेपुते (बारामती झटका)
सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या गहाळ मोबाईल शोध मोहिमेअंतर्गत, नातेपुते पोलीस ठाण्याने तांत्रिक तपासाद्वारे ३ लाख रुपये किंमतीचे एकूण 14 मोबाईल संच हस्तगत केले आहेत. हे सर्व मोबाईल संबंधित मूळ मालकांना बोलावून त्यांच्या स्वाधीन करण्यात आले.
नातेपुते पोलीस ठाणे हद्दीत मोबाईल गहाळ झाल्याबाबत प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने तपासाला गती देण्यात आली होती. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अकलुज यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, पोना/562 लोहार, पोना 559 वाघमोडे, पोकॉ/532 मदने, पोकॉ/362 शिंदे यांनी तांत्रीक विश्लेशनाचा वापर करून या मोबाईलचा माग काढला. हस्तगत करण्यात आलेला 3,00,000/-रुपयांचा मुद्देमाल (14 मोबाईल) कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मूळ मालकांना परत करण्यात आला आहे.
ही यशस्वी कामगिरी मा. पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, मा. अप्पर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण आणि मा. उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विशाल वायकर, मपोसई/सोनल मोरे, पोना/562 लोहार, पोना 559 वाघमोडे, पो.कॉ. मदने पोकॉ/362 शिंदे व नातेपुते पोलीस ठाणेकडील अंमलदारांच्या पथकाने केली आहे.
नागरिकांनी आपले मोबाईल गहाळ झाल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन नातेपुते पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात येत आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



