Uncategorized

चि.यशराज निंबाळकर यांच्या दैदीप्यमान यशामुळे बिनविरोध उपसरपंच पदाची संधी मिळाली.

ज्येष्ठांचे मार्गदर्शन व तरुणांचे सहकार्य घेऊन गावात विकासाची गंगा आणणार – नवनिर्वाचित उपसरपंच यशराज नितीनराजे निंबाळकर.


सवतगव्हाण (बारामती झटका)


माळशिरस तालुक्यातील सवतगव्हाण ग्रामपंचायतीत थेट जनतेतील सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्या चुरशीच्या व रंगतदार निवडणुकीत प्रभाग क्रमांक दोन मध्ये चिरंजीव यशराज नितीनराजे निंबाळकर यांचा सोलापूर जिल्ह्यात निवडणुकीचा अटकेपार झेंडा गेलेला आहे. वार्डात प्रतिस्पर्धी चार उमेदवारांचे डिपॉझिट जप्त करून मतदान झालेल्या मतदानामध्ये 82% मतदान घेऊन दैदीप्यमान विजय मिळवणारा सोलापूर जिल्ह्यात तरुणाईचा आयडॉल ठरलेला चि. यशराज निंबाळकर यांच्या दैदीप्यमान यशामुळे कमी वयात बिनविरोध उपसरपंच पदाची संधी मिळालेली आहे.

प्रभाग क्रमांक दोन कांबळे सचिन बलभीम 5, जाधव जयश्रीराम विठ्ठल 63, देखणे जयश्री हनुमंत 6, निंबाळकर यशराज नितीन 423, मोरे मिलिंद महादेव 15, नोटा 11 एकूण मतदान 523 झालेले होते.

सवतगव्हाणचे माजी सरपंच स्वर्गीय रावसाहेब निंबाळकर यांचे नातू व अकलूज खरेदी विक्री संघाचे चेअरमन व माजी सरपंच नितीनराजे निंबाळकर यांचे चिरंजीव आहेत. माळशिरस तालुक्याच्या पूर्व भागामध्ये सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या विचारावर राजकारण व समाजकारण करणारे सवतगव्हाण येथील निंबाळकर परिवार आहे.
.
सवतगव्हाण ग्रामपंचायतीची निवडणूक माळशिरस तालुक्याच्या पूर्व भागाचे नेते खरेदी विक्री संघाचे चेअरमन नितीनराजे निंबाळकर यांनी थेट जनतेतील लोकनियुक्त सरपंच रीना पवार व तीन सदस्य यांची बिनविरोध निवड करण्यात आलेली होती. उर्वरित सदस्यांच्या निवडीमध्ये पहिल्यांदाच चिरंजीव यशराज निंबाळकर यांना ग्रामपंचायत निवडणुकीत वार्ड क्रमांक दोन मधून उभे केलेले होते. यशराज यांच्या विरोधी चार सदस्य उभे होते. निंबाळकर घराण्याचा सामाजिक कार्याचा व राजकारणाचा वसा उपयोगी येऊन मतदारांनी व तरुणांनी निवडणूक हातामध्ये घेऊन यशराज निंबाळकर यांचा सोलापूर जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत अटकेपार झेंडा फडकविलेला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच चार सदस्यांची डिपॉझिट जप्त करून झालेल्या मतदानापैकी 82 टक्के मतदान घेणारा चिरंजीव यशराज नितीनराजे निंबाळकर याने राजकारणात नवा इतिहास निर्माण केलेला आहे. यशराज निंबाळकर यांच्या यशाबद्दल तालुक्यातून व तालुक्याच्या बाहेरून कौतुक केले जात होते. पहिल्यांदा उपसरपंच होण्याची संधी मिळणार अशी तरुण वर्गामध्ये चर्चा सुरू होती.


नवनिर्वाचित उपसरपंच यशराज निंबाळकर यांची बारामती झटका संपादक श्रीनिवास कदम पाटील यांनी उपसरपंच पदाची जबाबदारी आल्यानंतर पहिल्यांदा मुलाखत घेण्यात आली. त्यावेळेस यशराज निंबाळकर यांनी सांगितले, स्वर्गीय रावसाहेब निंबाळकर व स्वर्गीय प्रकाशराव निंबाळकर पाटील यांची प्रेरणा घेऊन माळशिरस पंचायत समितीचे माजी सभापती सुभाषदादा निंबाळकर अकलूज खरेदी विक्री संघाचे चेअरमन नितीनराजे निंबाळकर माजी उपसरपंच अविनाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली थेट जनतेतील लोकनियुक्त बिनविरोध सरपंच रीना पवार व ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील तरुणांच्या सहकार्याने गावामध्ये विकासाची गंगा आणण्यासाठी लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे ज्येष्ठांचे मार्गदर्शन व तरुणांचे सहकार्य घेऊन गावातील वंचित घटकांना न्याय देऊन विविध शासकीय योजनांचा व्यक्तिगत व सार्वजनिक लाभ देण्यासाठी प्रयत्न करून सर्वांनी उपसरपंच पदाची संधी दिलेली आहे त्या संधीचे सोने करून आदर्श व पारदर्शक ग्रामपंचायत कारभार करून सुंदर गाव व स्वच्छ गाव सरपंच रीना पवार यांच्या सहकार्याने करणार असल्याचे नवनिर्वाचित उपसरपंच चिरंजीव यशराज निंबाळकर यांनी बिनविरोध निवड झाल्यानंतर पहिल्याच मुलाखतीत सांगितले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button