ताज्या बातम्याराजकारण

ऐन दिपावलीत ओवा खपला नाही मात्र, खासदारांचा दिपावली मेळाव्यानंतर अकलूज परिसरात ओव्याचा खप वाढला.

दीपावलीत तळलेले पदार्थ खुसखुशीत व्हावे यासाठी ओवा वापरतात, दिपावलीत पदार्थांना कमी मात्र पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या दिपावली मेळाव्यानंतर अकलूज परिसरात पोटदुखीमुळे ओव्याची मागणी वाढली..

नातेपुते येथील मधुर मिलन कार्यालयातील दीपावली मेळावा ट्रोल करणाऱ्यांनी ड्रोनचे फोटो पाहावे

अकलूज (बारामती झटका)

माढा लोकसभा मतदारसंघाचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी मतदार संघात सिंचन, रेल्वे मार्ग, रेल्वे स्टेशन, विविध रस्ते, यासाठी सततचा पाठपुरावा करून अनेक प्रश्न मार्गी लावलेले होते. मतदार संघातील कार्यकर्त्यांशी सुसंवाद साधावा, यासाठी माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथील मधुर मिलन मंगल कार्यालय येथे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केलेला होता. सदरचा कार्यकर्ता मेळावा संयोजकांच्या अपेक्षेपेक्षा चांगला झालेला होता. सदरच्या कार्यक्रमाचे बारामती झटका यूट्यूब चैनलवर थेट प्रक्षेपण सुरू होते. संयोजकांनी स्क्रीन लावलेली होती. ड्रोनच्या साह्याने चित्रीकरण केलेले होते. विघ्नसंतोषी, अपरिपक्व, असंतुष्ट काही कार्यकर्त्यांनी दीपावली मेळाव्याला सुरुवात होण्याअगोदर रिकाम्या खुर्च्यांचे फोटो व्हायरल करून उत्साही कार्यकर्त्यांनी नेत्यांना खुश करण्याकरता केलेली अयशस्वी कामगिरी केली, अशा रोल करणाऱ्या कार्यकर्त्यांनी ड्रोनचे फोटो डोळे उघडून पहावे. दीपावली स्नेह मेळावा कार्यक्रम यशस्वी झाल्यानंतर माळशिरस तालुक्यात विशेष करून अकलूज परिसरात पोटदुखी वाढलेली आहे. इतकी वाढली की, दीपावलीमध्ये तळलेले पदार्थ खुसखुशीत व्हावेत, यासाठी ओवा वापरतात. दीपावलीत पदार्थांना ओवा कमी मात्र, पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या दीपावली मेळाव्यानंतर अकलूज परिसरात पोटदुखीमुळे ओव्याची मागणी वाढली असल्याची चर्चा भाजपच्या बुद्रुक गटात सुरू झालेली आहे.

माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी निवडणुकीत जनतेसमोर मते मागत असताना मतदार संघातील विकासकामे करण्याचे आश्वासन दिलेले होते‌. त्यामध्ये सांगोला, माढा, करमाळा, माणखटाव, फलटण या तालुक्यासह माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न असणारा निरा-देवधर प्रकल्प, दळणवळण, शिक्षण व औद्योगीकरणयासह पांडुरंगाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सोयीचे व्हावे, यासाठी इंग्रजकालीन घोषणा असणारी फलटण पंढरपूर रेल्वेचा प्रश्न मार्गी लावलेला आहे. माळशिरस तालुक्यातील रस्त्यांसाठी दीडशे कोटी रुपयाचा निधी मंजूर केलेला होता. अशा अनेक विकासकामांची कार्यकर्त्यांना व जनतेला माहिती व्हावी व कार्यकर्त्यांशी सुसंवाद व्हावा यासाठी दीपावली स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले होते. सदरच्या कार्यक्रमामध्ये प्रमुख अतिथी भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार व भाजपचे महाविजय 2024 संयोजक श्रीकांतजी भारतीय होते. मात्र, अपरिहार्य कारणाने येऊ शकलेले नव्हते. त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे नेते व कार्यकर्ते यांच्याशी सुसंवाद साधलेला आहे. त्याचीही चर्चा काही लोक करून स्वतःची पाठ स्वतः थोपटून घेत आहेत. उपस्थित सर्व नेत्यांनी येणाऱ्या लोकसभेला विद्यमान कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचीच उमेदवारी असल्याचे शिक्कामोर्तब झालेली आहे. त्यामुळे अनेकांच्या पोटात कालवाकालव सुरू झालेली आहे. गावरान उपाय ओवा आहे. यासाठी माळशिरस तालुक्यात पोटदुखीमुळे ओव्याची मागणी वाढलेली आहे‌. ओवा कमी पडू नये यासाठी भाजप बुद्रुकचे कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button