देशाच्या राष्ट्रीपती व राज्यापाल यांनी देशातील (MPSC) विद्यार्थीचे आंदोलन थांबण्यासाठी तात्काळ आयोगाचे अध्यक्ष ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घेण्यात यावा – शिवस्वराज्य युवा संघटनेची मागणी

पंढरपूर (बारामती झटका)
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) ही राज्यघटनेच्या अनुच्छेद ३१५ अन्वये स्थापन झालेली एक घटनात्मक संस्था आहे. त्यामुळे आयोगाच्या अध्यक्षांना किंवा सदस्यांना सहजासहजी पदावरून दूर करता येत नाही. त्यांच्या पदाची स्वायत्तता जपण्यासाठी राज्यघटनेत विशिष्ट कायदेशीर प्रक्रिया देण्यात आली आहे. भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद ३१६ (२) नुसार MPSC चे अध्यक्ष किंवा कोणतीही सदस्य आपल्या पदाचा राजीनामा महाराष्ट्राच्या राज्यपालांकडे स्वतःच्या हाताने लिहिलेल्या पत्राद्वारे सादर करू शकतात. राज्यपालांनी राजीनामा स्वीकारताच किंवा पत्रात नमूद केलेल्या तारखेपासून तो अमलात येतो. आयोगाला बरखास्त करण्याचा अधिकार केवळ भारताच्या राष्ट्रपतींना आहे. राज्यघटनेच्या अनुच्छेद ३१७ नुसार ही कारवाई दोन प्रमुख मार्गांनी केली जाते.
सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशीद्वारे (गैरवर्तणूक – Misbehavior) जर अध्यक्षांवर किंवा सदस्यावर गैरवर्तणूक (Misbehaviour) किंवा असमर्थतेचा आरोप असेल, योग्य कायदेशीर चौकशी करून आयोगाची हाकालपट्टी केली जाते. थेट राष्ट्रपतींद्वारे हकालपट्टी (विशेष परिस्थिती) काही विशिष्ट परिस्थितींमध्ये जसे की आयोग दिवाळखोरीत काढणे किंवा आर्थिक भ्रष्ट्राचार निदर्शनास आल्यास सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशीची गरज नसते. राष्ट्रपती थेट आदेश काढून पदावरून हटवू शकतात. महाराष्ट्रातील MPSC विद्यार्थ्यांनी ह्या मुद्द्याचा विचार करावा किंवा तो त्यांनी केलेला असणार आहेच.
काल मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस ह्याच मुद्द्याचा आधार घेत आंदोलनकारी विद्यार्थ्याना चुकीच ठरवत होते. ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष होता कामा नये. कारण भाजपाला विद्यार्थी, शेतकरी, मंजूर किंवा सर्वसामान्य घटकाशी काहीच घेणंदेण नाही. त्यांना ह्या असल्या आंदोलनाने काहीच फरक पडत नाही. त्यांचा हाच अजेंडा आहे की आमचे विद्यार्थी कसे मागे पडतील. म्हणून ह्याबाबत नक्कीच योग्य दिशानिर्देश ठरवत आंदोलन केले पाहिजे असे मला वाटते. अन्यथा वेळ, बुद्धी व पैसा वाया जाईल. देशाच्या राष्ट्रीपती व राज्यापाल यांनी देशातील (MPSC) विद्यार्थीचे आंदोलन थांबण्यासाठी तात्काळ आयोगाच्या अध्यक्ष ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घेण्यावा, अशी मागणी शिवस्वराज्य युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीपराजे मुटकुळे-पाटील यांनी केली आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



