एक अर्ज व संचालकांना मोठा धक्का, सोसायटीची पूर्ण बॉडी बरखास्तीच्या उंबरठ्यावर.

कालच्या पोराने घाम फोडला! एक अर्ज आणि तिरवंडी विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्या. ची पूर्ण बॉडी बरखास्तीच्या उंबरठ्यावर.
माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यातील तिरवंडी विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्या. मध्ये सध्या मोठी खळबळ उडाली आहे. बेकायदेशीर पद्धतीने संचालक पद भरल्याच्या प्रकरणावरून दाखल करण्यात आलेल्या एका तक्रार अर्जामुळे संपूर्ण सोसायटीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. फक्त २५ वर्षाच्या तरुणाने उचललेल्या या धाडसी पावलामुळे गावाच्या राजकारणाला घाम फुटला आहे. यश मिळो अथवा न मिळो, पण या धाडसी निर्णयामुळे संपूर्ण परिसरात चर्चा रंगली आहे.
या प्रकरणात अॅड. विठ्ठलराजे वाघमोडे पाटील हे वकील म्हणून सत्य व न्यायाच्या बाजूने उभे राहून लढा देत आहेत. ते गोर-गरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असून अनेक गरजूंना मोफत कायदेशीर सेवा पुरवतात.
हा लढा गेल्या १ वर्षापासून सुरू असून वकीलसाहेबांनी उभा केलेल्या या लढ्याचा निकाल आता हातात येईल, अशी स्पष्ट चिन्हे दिसत आहेत. हा वाद पुणे खंडपीठापर्यंत पोहोचला असून लवकरच सुनावणी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या प्रकरणाचा फटका सध्याच्या व्यवस्थापनाला बसू शकतो आणि परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की, संचालकांना पिशव्या घेऊन घरी जावे लागेल, अशीही जोरदार चर्चा गावात रंगली आहे.
कोणाचाही डोक्यावर हात नसताना, कोणताही राजकीय आधार नसताना उभा केलेला हा लढा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. अशी धाडसी वृत्ती आणि अन्यायाविरोधात उभे राहण्याची ताकद असलेले तरुणच भविष्यात मोठ्या उंचीवर पोहोचतात, असे मत गावकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
समाजाला अशा निर्भीड आणि न्यायासाठी लढणाऱ्या तरुणांची आज खऱ्या अर्थाने गरज आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



