“सह्याद्रीच्या कर्तुत्वाची यशोगाथा” चंद्रशेखर गायकवाड लिखित पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मा. आ. रामभाऊ सातपुते यांच्या शुभहस्ते अकलूजमध्ये संपन्न.

अकलूज (बारामती झटका)
साहित्यिक व व्याख्याते चंद्रशेखर गायकवाड लिखित 24 व्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा अकलूज येथे दि. 13/03/2026 रोजी सकाळी 11 वाजता भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे सचिव, माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला. यावेळी भाजपा शहर अकलूज मंडलचे अध्यक्ष सुजयसिंह माने पाटील, सोलापूर जिल्हा भाजपा सरचिटणीस सचिन शिंदे, अकलूज शहराध्यक्ष महादेव कावळे, तालुका समन्वयक निलेश ननवरे, भाजप शहर सरचिटणीस अमोल माने, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष निनाद पाटील यांच्या शुभहस्ते सदर पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला.
साहित्यिक व व्याख्याते चंद्रशेखर गायकवाड बोलताना म्हणाले, “जनता दरबारातून तळागाळातील जनतेच्या समस्या, अडचणी समजून घेऊन न्याय देणारे, शेतकऱ्यांच्या, जनतेच्या पाणी प्रश्नासाठी शासन दरबारी आवाज उठवून पाणी प्रश्न सोडवणारे, तळागाळातील गोरगरीब जनतेच्या आरोग्यासाठी चंदनासारखे झिजणारे आरोग्यदूत माळशिरस तालुक्यातील शेकडो लाडक्या बहिणींना विमान प्रवास घडवून आणणारे, मनुष्य सेवेला ईश्वर सेवा मानणारे कर्मयोगी माजी आमदार माननीय श्री. रामभाऊ सातपुते यांना ही साहित्यकृती अर्पण केली आहे.

यावेळी अकलूज शहरातील शेकडो नागरिकांची सदर कार्यक्रमास उपस्थित होती.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



