ह. भ. प. सागर महाराज चव्हाण, माळखांबीकर यांचे पुरंदावडे येथे सुश्राव्य कीर्तन होणार

वै. ह. भ. प. लक्ष्मण पवार यांच्या पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन, पुष्पवृष्टी, आरती व महाप्रसादाचे आयोजन
पुरंदावडे (बारामती झटका)
वैकुंठवासी ह. भ. प. लक्ष्मण तुकाराम पवार यांच्या प्रथम पुण्यस्मरणाचे आयोजन सोमवार दि. १९/१०/२०२६ रोजी पुरंदावडे, पवारवस्ती, ता. माळशिरस येथे करण्यात आले आहे. या प्रथम पुण्यस्मरण निमित्त सुप्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. सागर महाराज चव्हाण माळखांबीकर यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कीर्तनानंतर आरती, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले आहे.

वैकुंठवासी ह. भ. प. लक्ष्मण पवार यांनी शिक्षण प्रसारक मंडळामध्ये ३८ वर्षे शिपाई पदावर वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी गेली आहे. त्याच्या परिवारामध्ये पत्नी सुंदर लक्ष्मण पवार, वैशाली ज्ञानेश्वर सोळगे आणि स्वाती रामा गुंजवटे या दोन मुली आणि गौरीहार लक्ष्मण पवार हा एक मुलगा, सून उषा गौरीहार पवार, तर वैष्णवी गौरीहार पवार, अंकिता गौरीहार पवार आणि अथर्व गौरीहार पवार हे तीन नातवंडे आहेत.

तरी या पुण्यस्मरण सोहळ्यास उपस्थित राहून सुश्राव्य कीर्तनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन समस्त पवार परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



