मळोली गावचे बाळासाहेब सोपानराव जाधव पाटील यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन…

भारतीय जनता पार्टीचे माळशिरस मंडल उपाध्यक्ष तथा शिवशंकर सोसायटीचे माजी चेअरमन शशांक उर्फ भैया पाटील यांना पितृशोक..
मळोली (बारामती झटका)
मळोली, ता. माळशिरस येथील प्रगतशील बागायतदार बाळासाहेब सोपानराव जाधव पाटील उर्फ बाळू दादा यांचे वयाच्या 74 व्या वर्षी सोमवार दि. 19/10/2026 रोजी सकाळी अल्पशा आजाराने पंढरपूर येथील दवाखान्यात उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे, भाऊ,भावजय, पुतणे असा मोठा परिवार आहे. भारतीय जनता पार्टीचे माळशिरस मंडल उपाध्यक्ष तथा शिवशंकर विविध कार्यकारी सेवा सोसायटी मळोली, पाटील वस्ती या संस्थेचे माजी चेअरमन शशांक उर्फ भैय्या पाटील यांचे वडील होते. त्यांच्यावर आजच दुपारी एक वाजता मळोली येथील वैकुंठ स्मशानभूमी येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.
बाळूदादा यांचा स्वभाव मनमिळावू होता. ते सर्वांशी मिळून मिसळून वागत असत. उच्चशिक्षित असूनही नोकरी न करता शेती करीत होते. बाळू दादा याच्या दुःखद निधनाने जाधव पाटील परिवार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. जाधव पाटील परिवार यांना दुःखातून सावरण्याचे ईश्वर बळ देवो व त्यांच्या आत्म्याला शांती लाभो, हीच बारामती झटका परिवार यांचे कडून भावपूर्ण आदरांजली आहे…
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



