हनुमान जयंती दिवशी वाघोलीत हनुमंताने घेतला शेवटचा श्वास….

वाघोली (बारामती झटका)
दि. 2 एप्रिल रोजी हनुमान जयंती होती. सर्रास शहरी भागाबरोबर ग्रामीण भागातही पहाटे 5 ते सकाळी 7 वाजेपर्यंत हनुमान जयंतीचा कार्यक्रम साजरा केला जातो. वाघोली, ता. माळशिरस येथील प्रगतशील बागायतदार श्री. हनुमंत शंकर मिसाळ पाटील यांचे दि. 2 एप्रिल रोजी सकाळी 6.00 वा हनुमान जयंती दिवशी ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने वयाच्या 85 व्या वर्षी निधन झाले. वाघोली व वाघोली परिसरात हनुमान जयंती दिवशीच वाघोलीतील हनुमंताने घेतला शेवटचा श्वास, अशी चर्चा सुरु झाली.
त्यांच्या पाश्चात पत्नी, तीन विवाहित मुले, सुना, चार विवाहित मुली, नातवंडे, परतवंडे असा परिवार असून वि. का. वि. सोसायटीचे माजी चेअरमन व ग्रामपंचायतीचे सदस्य बळीराम मिसाळ पाटील यांचे वडील होत.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



