जिल्हा परिषद सदस्य श्री. चंद्रकांत जाधव यांच्या शुभहस्ते घोरपडे पेट्रोलियम मॅनेजर महेश माने यांचा सन्मान…

मळोली (बारामती झटका)
पिलीव जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य श्री. चंद्रकांत ज्ञानेश्वर जाधव यांच्या शुभहस्ते घोरपडे पेट्रोलियम मळोलीचे मॅनेजर महेशशेठ अशोकराव माने यांचा सन्मान वाढदिवसानिमित्त करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नेते बाळकृष्ण शंकरराव जाधव उर्फ बाळबापू जाधव, शिवशंकर सोसायटीचे माजी चेअरमन व मळोली ग्रामपंचायतीचे माजी सदस्य अरुण पवार, मळोली ग्रामपंचायतीचे सदस्य तथा विशेष कार्यकारी अधिकारी भीमराव मोरे, भारतीय जनता पार्टीचे माळशिरस मंडल उपाध्यक्ष शशांक उर्फ भैय्या पाटील, युवा नेते संदीपराव शिवाजीराव जाधव उर्फ सनलाईट, यशराज कृषी केंद्राचे सर्वेसर्वा प्रगतशील बागायतदार अतुल पवार, अरबाज मनेरी, सुरज माने, राजवर्धन पवार, हर्षवर्धन पवार, जयवर्धन पवार, यशवर्धन पवार, बारामती झटका वेब पोर्टल आणि युट्युब चॅनलचे संपादक श्रीनिवास कदम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते…

चंद्रकांत जाधव कायम सर्वसामान्य व गोरगरीब जनतेच्या सानिध्यात असतात. नेहमी सुखदुःखामध्ये सहभागी राहत असतात. त्यांचा मनमिळावू स्वभाव असल्याने सर्वच क्षेत्रातील तरुणांशी जवळीकता कायम असते. जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत जाधव यांनी घोरपडे पेट्रोलियमचे मॅनेजर महेश माने यांचा वाढदिवसानिमित्त डोक्यावर फेटा, गळ्यामध्ये गुलाबांचा हार घालून सन्मान केल्यानंतर चेहऱ्यावरील आनंद सर्व काही सांगून जात आहे..

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



