जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानंतर बारामतीत तात्काळ स्वच्छता मोहीम;

दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या परंपरेला साजेसं काम
बारामती (बारामती झटका)
जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष सचिन सातव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगराध्यक्ष, आरोग्य सभापती आणि नगरसेवक सदस्य व मुख्याधिकारी हे स्वतः शहरामध्ये पालखीचे आगमन आणि प्रस्थान झाल्यानंतर बारामतीच्या परंपरेला साजेसं काम करण्यात आले.
शहर स्वच्छतेच्या कार्यामध्ये लोकप्रतिनिधी, प्रशासन, सामजिक सेवाभावी संस्था, नागरिकांनी मिळून सहभाग घेऊन गांधी चौक ते गुणवडी चौक यादरम्यान रस्त्याची स्वतः नगराध्यक्ष, सभापती व मुख्याधिकारी प्रत्यक्ष सहभागी होवून संपूर्ण स्वच्छता करुन घेतली.
नगराध्यक्ष व लोकप्रतिनिधी व वरीष्ठ अधिकारी यांच्या स्वच्छतेच्या कामातील सक्रिय योगदानामुळे सर्व सफाई कर्मचारी व इतर अधिकारी यांना प्रोत्साहन मिळून त्यांनी देखील आपल योगदान देवून स्वच्छता मध्ये मोलाची भर घातलेली आहे.
शहरामध्ये शारदा प्रांगण येथे पालखी मुक्कामी आल्यानंतर केवळ एका तासाच्या आतमध्ये नागवडे वस्ती ते देशमुख चौक ते शारदा प्रांगण तसेच संपूर्ण शहर, शारदा प्रांगण, मुख्य रस्ते मैदाने यांची स्वच्छ करून केली. बारामती स्वच्छ सुंदर ठेवून सर्वांनी मोलाची भूमिका निभावलेली.
आज सकाळीदेखील शारदा प्रांगण येथून पालखीचे प्रस्थान झाल्यानंतर एका तासाच्या आत शहरातील मुख्य रस्ते स्वच्छ करण्यात आलेले आहेत.
नगराध्यक्ष सचिन सातव, आरोग्य सभापती नवनाथ बल्लाळ, मुख्याधिकारी पंकज भुसे, दोन मुख्य आरोग्य निरीक्षक, सुमारे १८ मुकादम व ४५० सफाई मित्र यांनी अहोरात्र मेहनत घेऊन बारामती शहराच्या परंपरेला साजेसे काम करुन शहरातील संपूर्ण रस्त्यांची स्वच्छता सुव्यवस्था राखलेली आहे.

श्री सचिन सातव, नगराध्यक्ष
जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहोळ्याच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कार्याच्या परंपरेस साधून उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषदने अभूतपूर्व स्वच्छता राबवून संपूर्ण शहर स्वच्छ करण्यात आलेले आहे.
श्री.नवनाथ बल्लाळ, आरोग्य सभापती:
बारामती शहराच्या स्वच्छतेसाठी अहोरात्र काम करणार्या सफाई कर्मचारी यांच्या मोलाच्या योगदानातून पालखी सोहळ्यात संपूर्ण शहराची स्वच्छता विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात आलेली आहे.
श्री. पंकज भुसे, मुख्याधिकारी:
बारामती नगरपरिषदेच्या अधिकारी कर्मचारी यांच्या माध्यमातून नियोजनबद्ध कामकाज करून पालखी सोहळादरम्यान संपूर्ण शहराची स्वच्छता केली.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



