जनसत्ता मराठी न्युज ४ था वर्धापन दिन व धाडस टाईम्स 24 प्रथम वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान सोहळा

कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर शुभ हस्ते मा. आमदार राम सातपुते व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार…
माळशिरस (बारामती झटका)
जनसत्ता मराठी न्युज ४ था वर्धापन दिन व धाडस टाईम्स 24 प्रथम वर्धापन दिन यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतीक, पत्रकार, क्रिडा, आरोग्य, क्षेत्रामध्ये उल्लेखनिय काम करणाऱ्या मान्यवरांचा भव्य सन्मान सोहळा मंगळवार दि.०१/०९/२०२६ रोजी राष्ट्रसंत गाडगेबाबा सभागृह पंचायत समिती, माळशिरस येथे दुपारी १ वा. संपन्न होत आहे. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माढा लोकसभा मतदारसंघाचे कार्यतत्पर पाणीदार माजी खासदार रणजितसिंह (दादा) नाईक निंबाळकर हे आहेत तर, माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय दमदार माजी आमदार रामभाऊ सातपुते शुभहस्ते संपन्न होणार आहे.
यावेळी विशेष उपस्थितीत मा.श्री. रामहरी (आप्पा) रुपनवर (मा. आमदार विधानपरिषद), मा.श्री. बाबाराजे देशमुख (मा. उपाध्यक्ष जि.प. सोलापूर), श्री. तुकाराम (भाऊ) देशमुख (मा. पंचायत समिती सदस्य, माळशिरस), मा.श्री. रघुनाथ (आण्णा) कवितके ( अध्यक्ष अक्षय शिक्षणसंस्था), मा.श्री. सुरेश आबा पालवे (मा.जि. नियोजन समिती, सदस्य), मा.श्री. किरण साठे (पक्षप्रमुख, महाराष्ट्र विकास सेना), मा.श्री किशोर भैय्या सुळ-पाटील (मा.उपसभापती पंचायत समिती माळशिरस), मा.श्री. मामासाहेब पांढरे ( कृषी उत्पन्न बाजार समिती, अकलूज), मा.श्री. शरद बापु मोरे (अध्यक्ष, शिवप्रसाद उद्योग समुह), मा.श्री.आप्पासाहेब देशमुख (मा. नगराध्यक्ष, माळशिरस नगरपंचायत), मा.श्री. मधुकर पाटील (मा. पंचायत समिती सदस्य, माळशिरस) आदी मान्यवर आहेत.

तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री. दत्ता (भैय्या) मगर (सभापती माळशिरस पंचायत समिती), मा.सौ. मनिषा अमोल मदने ( उपसभापती माळशिरस पंचायत, मा.श्री. दत्तात्रय शेळके (पंचायत समिती सदस्य, माळशिरस), मा.श्री. ॲड. प्रविण वाघमोडे ( पंचायत समिती सदस्य, माळशिरस), मा.श्री. युवराज (तात्या) झंजे ( पंचायत समिती सदस्य, माळशिरस), मा.श्री. ॲड. राहुल दादा वाघमोडे (PSO मा.श्री. एकनाथ शिंदे साहेब), मा.श्री. संजय (भाऊ) चव्हाण (रामोशी समाज संघटना, महाराष्ट्र राज्य), मा. सौ. ॲड. रेश्माताई टेळे (नगरसेविका नगरपंचायत माळशिरस ), मा.श्री. शिवाजीराव देशमुख (मा. नगराध्यक्ष, नगरपंचाय माळशिरस), मा.श्री. आनंद शेंडगे सर ( पंचायत समिती सदस्य, माळशिरस), मा.श्री. राजकुमार हिवरकर ( जिल्हा प्रमुख ओबीसी शिवसेना), मा.श्री. शाखा भाऊ कर्चे (युवा नेते), मा.श्री. बाळासाहेब सपताळे (मा. जिल्हा परिषद सदस्य, सोलापूर), मा.श्री. संतोष (आबा) वाघमोडे ( नगरसेवक माळशिरस नगरपंचायत), मा.श्री. विनोद रणदिवे (दक्षता व नियंत्रण समिती सदस्य, सोलापूर), मा. श्री. बाळासाहेब सरगर ( सोलापूर जिल्हा अध्यक्ष किसान मोर्चा), मा.श्री. नानासाहेब रणदिवे (संस्थापक अध्यक्ष भुमिहीन शेतकरी कामगार संघटना), मा.श्री. गणेश भाऊ भोसले ( संस्थापक अध्यक्ष क्रांतीकारी संघर्ष सेना), मा.श्री. शिवराज पुकळे ( सोलापूर जिल्हा अध्यक्ष युवा मोर्चा), मा.श्री. दादासाहेब लोखंडे ( भारतीय दलीत महासंघ प्रदेश अध्यक्ष), मा.श्री. नंदकुमार लांडगे (नगराध्यक्ष नातेपुते नगरपंचायत), मा.श्री. नवनाथ भाऊ साठे ( लहुजी साम्राज्य ) आदी मान्यवर उपस्थित असणार आहेत.

तरी या भव्य सन्मान सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन मा.श्री. सचिन रणदिवे ( संपादक जनसत्ता मराठी न्युज ) मो.९७३००९३६११, मा.श्री. महेश मोहिते (संपादक धाडस टाईम्स २४) मो. ९३०७१२५५९८ यांच्यावतीने करण्यात आले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



