जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व पंचायत समिती सभापती, उपसभापती यांच्या मुहूर्त ठरला…

मुंबई (बारामती झटका)
महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव बा. म. आसोले यांनी जिल्हा अधिकारी रायगड, रत्नागिरी, सिंदुदुर्ग, सोलापूर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, लातूर आणि परभणी अशा १२ जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व १२५ पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती यांच्या निवडीचे आदेश काढले आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार राज्यातील १२ जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांची सार्वत्रिक निवडणूक पार पडली आहे. त्या अनुषंगाने जिल्हा परिषद अध्यक्ष व पंचायत समिती सभापती यांची निवड करण्यासाठी जिल्हा परिषदा व पंचायत समितीच्या बैठका घेणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या अधिनियम, १९६१ च्या कलम ११ (१) आणि कलम ५९(१) मधील तरतुदीनुसार सार्वत्रिक निवडणूकीत निवडून आलेल्या सदस्यांचा कार्यकाळ हा पहिल्या बैठकीपासून सुरु होतो. जिल्हाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या अधिनियम, १९६१ मधील तरतुदीनुसार, जिल्हा परिषदा तसेच पंचायत समित्यांची पहिली बैठक दि. २० मार्च, २०२६ पूर्वी आयोजित करावी, असे निर्देश अवर सचिव बा. म. आसोले यांनी पत्रकान्वये काढले आहेत. त्यामुळे आता सर्वांचे याकडे लक्ष लागून राहिले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



