पिंपरीचे माजी सरपंच नानासाहेब राणे यांचे ग्रामसेवकाचा चार्ज तातडीने देण्याबाबतचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

पिंपरी (बारामती झटका)
पिंपरी, ता. माळशिरस येथील माजी सरपंच नारायण राणे यांनी माळशिरस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना ग्रामसेवकाचा चार्ज तातडीने देण्याबाबतचे निवेदन दिले आहे.
सदर निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, मौजे पिंपरी ता. माळशिरस गावातील ग्रामपंचायतीकडे पिंपरी गावातील ग्रामस्थांची दैनंदिन कामे ग्रामसेवक (नसलेले) विना खोळंबलेली आहेत. महत्त्वाच्या कामासाठी ग्रामपंचायत कार्यालयात गेले असता तेथील संबंधित जबाबदार व्यक्ती या आपल्या गावाला ग्रामसेवक नाही. ग्रामसेवक येईपर्यंत कोणतेही काम होणारच नाही, अशी थातूरमातूर उत्तरे दिली जात आहेत.
तसेच सध्या ग्रामपंचायतीचा कार्यकाल संपत आल्याने निवडणुकीच्या अनुषंगाने वार्डरचनेचा प्रोग्राम शासनाने जाहीर केलेला आहे. त्याही कामाकरिता ग्रामसेवक यांची अत्यंत आवश्यकता असतेच. तसेच घरकुलाची बिले व इतर महत्त्वाची कामे ग्रामसेवक विना खोळंबलेली आहेत. तरी पिंपरी गावातील ग्रामस्थांचा व नागरिकांचा विचार करून तातडीने ग्रामसेवक चार्ज कोणाकडे तरी द्यावा व कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी सहकार्य मिळावे, ही नम्र विनंती करीत आहोत.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



