जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी नानासाहेब वाघमोडे तर उपाध्यक्षपदी विलास वळकुंदे यांची निवड…

माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस येथील
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वाघमोडे वस्ती, ६१ फाटा शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीची नूतन कार्यकारिणी निवड करण्यात आली. यामध्ये बिनविरोध सर्वानुमते श्री. नानासाहेब हरिबा वाघमोडे यांची अध्यक्ष म्हणून तर श्री. विलास शिवाजी वळकुंदे यांची उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
यावेळी सभेची सुरुवात शाळेचे मुख्याध्यापक श्री. जाधव सर यांनी यापूर्वीच्या व्यवस्थापन समितीने अतिशय छान काम केल्याचा उल्लेख करत नवीन समिती निवडीचे सर्व नियम समजावून सांगितले. त्यानंतर चर्चा होवून सर्वानुमते निवड करण्यात आली. सदस्य म्हणून श्री. सचिन तानाजी वाघमोडे, श्री. उत्तम धर्मराज वाघमोडे, सौ. स्वाती विष्णू वाघमोडे, सौ. रेखा धनाजी वाघमोडे, सौ. रुक्मिणी सुरेश वाघमोडे, सौ. पूजा तात्यासो वाघमोडे यांची निवड करण्यात आली. शिक्षणप्रेमी सदस्य म्हणून श्री. तुकाराम मारुती वाघमोडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
श्री. धनाजी श्रीपती वाघमोडे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे नानासाहेब यांना सुपूर्द करताना गेल्या दोन वर्षात समितीमध्ये काम करतानाचे अनुभव सांगत सहकार्याबद्दल आभार मानले. नूतन अध्यक्ष श्री. नानासाहेब वाघमोडे सत्काराला उत्तर देताना सर्वांना विश्वासात घेवून शाळेसाठी चांगले काम करण्याचे आश्वासन दिले. तर उपाध्यक्ष श्री. विलास वळकुंदे यांनी निवड केल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

यावेळी किसन वाघमोडे, पोपट वळकुंदे, काका वळकुंदे, तानाजी बंडगर, राजाराम वाघमोडे, सागर वाघमोडे, बापू वाघमोडे, सचिन वाघमोडे, उमेश वाघमोडे, दादा वाघमोडे, सुखदेव वाघमोडे आदी पालक उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे आभार मुख्याध्यापक श्री. जाधव सर यांनी मानले.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.