ताज्या बातम्याराजकारण

भाजपा किसान युवा मोर्चाच्या माळशिरस तालुका अध्यक्षपदी बलभीम जाधव यांची निवड…

माळशिरस (बारामती झटका)

भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तथा नीरा-देवधर संघर्ष पाणी हक्क समितीचे अध्यक्ष श्री. बाळासाहेब महादेव सरगर यांनी श्री. बलभीम भगवान जाधव मु. पो. मळोली, ता. माळशिरस, यांची किसान युवा मोर्चा माळशिरस तालुका अध्यक्षपदी निवड केली आहे. सदर निवडीचे पत्र भारतीय जनता पक्षाचे प्रांतिक सदस्य सोलापूर जिल्हा सह प्रभारी सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य के. के. पाटील यांच्या शुभहस्ते देण्यात आले. यावेळी भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर, भारतीय जनता पक्षाचे माळशिरस तालुका संघटन सरचिटणीस संजयजी देशमुख, युवराज वाघमोडे, मिनीनाथ मगर आदी मान्यवर उपस्थित होते.

श्री. बलभीम भगवान जाधव मळोली, ता. माळशिरस यांनी गावामध्ये भारतीय जनता पक्षाची शाखा सुरू करून भारतीय जनता पक्षाचे अनेक वर्ष प्रामाणिकपणे व निष्ठेने कार्य करीत आहेत. भारतीय जनता पक्षाने त्यांच्यावर माळशिरस तालुका उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिलेली होती. उपाध्यक्ष पदावर काम करीत असताना माळशिरस तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाची ध्येय धोरणे व विचारधारा तळागाळात पोचवण्याचे कार्य प्रामाणिकपणे केलेले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी यांनी त्यांच्यावर किसान युवा मोर्चा माळशिरस तालुका अध्यक्ष पदाची निवड केलेली आहे.

श्री. बलभीम जाधव यांच्या निवडीचे स्वागत अनेक स्तरातून होत असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort