ताज्या बातम्यासामाजिक

कन्हेरगावच्या कावीरा माने यांचा पोलीस आयुक्तांच्या हस्ते गौरव.

कन्हेरगांव (बारामती झटका)

कन्हेरगाव, ता. माढा येथील कावीरा नानासाहेब माने यांना महाराष्ट्र पोलीस दलाकडून दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह (DG Insignia) ने गौरविण्यात आले. हा सन्मान मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनी (१ मे) प्रदान करण्यात आला.

कावीरा माने या मुंबई शहर पोलीस दलात महिला पोलीस अंमलदार म्हणून कार्यरत असून त्या कन्हेरगाव येथील पोलीस नाईक नानासाहेब माने यांच्या पत्नी आहेत.
महाराष्ट्र पोलीस दलातर्फे क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दरवर्षी DG Insignia देऊन सन्मानित करण्यात येते.

राज्य तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील पोलीस क्रीडा स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून पदके जिंकणाऱ्या खेळाडूंची या सन्मानासाठी निवड केली जाते. या सन्मानामध्ये प्रशस्तीपत्रासह वर्दीवर लावण्यासाठी विशेष DG Insignia (स्टार-बक्कल) प्रदान केले जाते. हा पुरस्कार पोलीस दलातील उत्कृष्ट सेवा, कौशल्य आणि कर्तृत्वाचे प्रतीक मानला जातो. दरवर्षी महाराष्ट्र दिनानिमित्त या सन्मानाची घोषणा करून विशेष समारंभात वितरण करण्यात येते.

कन्हेरगाव परिसरात आनंदाचे वातावरण असून त्यांच्यावर माजी संचालक शिवाजी डोके, उपसरपंच लिंबाजी मोरे, कन्हेरगांवचे माजी उपसरपंच धनंजय मोरे, माजी चेअरमन नागेश मोरे, ग्रामपंचायत सदस्य विजय माने, पृथ्वीराज माने, महेश माने, बालाजी माने, रवींद्र माने, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय पाटील, उपाध्यक्ष सचिन माने, माजी अध्यक्ष संजय उर्फ बाळासाहेब डोके पाटील, राजेंद्र केदार, विकास माने, रोहन माने यांनी अभिनंदन केले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button