शिंदेवाडी येथील प्रगतशील बागायतदार दिलीपराव गुलाबराव शिंदे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन..

शिंदेवाडी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन तथा भाजप नातेपुते मंडल उपाध्यक्ष किरण शिंदे यांना पितृषोक…
नातेपुते (बारामती झटका)
शिंदेवाडी, ता. माळशिरस येथील दिलीपराव गुलाबराव शिंदे यांचे वयाच्या 68 व्या वर्षी अल्पशा आजाराने रविवार दि. 03/05/2026 रोजी दुःखद निधन झालेले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. शिंदेवाडी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे विद्यमान चेअरमन तथा भारतीय जनता पार्टीचे नातेपुते मंडल उपाध्यक्ष श्री. किरण दिलीपराव शिंदे यांचे वडील होते. त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात सायंकाळी शिंदेवाडी येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आलेले आहेत. त्यांचा रक्षाविसर्जन तिसऱ्याचा कार्यक्रम मंगळवार दि. 05/05/2026 रोजी सकाळी आठ वाजता होणार आहे..
स्वर्गीय दिलीपराव शिंदे यांना नाना या टोपण नावाने ओळखत होते. उत्कृष्ट शेतकरी अशी त्यांची ओळख होती. सोज्वळ स्वभाव, सुसंस्कृत अशी त्यांची वागणूक असल्याने शिंदेवाडी पंचक्रोशीमध्ये सर्वपरिचित होते. त्यांच्या दुःखद निधनाने शिंदे परिवार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे.

स्वर्गीय नानांच्या आत्म्यास शांती लाभो व शिंदे परिवार यांना दुःखातून सावरण्याचे ईश्वर बळ देवो, हीच बारामती झटका परिवार यांचे कडून भावपूर्ण आदरांजली आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



