ताज्या बातम्याराजकारण

पश्चिम बंगाल, पुद्देचेरी, आसाम राज्यात भारतीय जनता पार्टीच्या बहुमताने सरकार स्थापनेचा जल्लोष अकलूजमध्ये होणार….

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश चिटणीस तथा माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार मा. आमदार राम सातपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत महाविजयाचा जल्लोष होणार…

अकलूज (बारामती झटका)

देशाचे कणखर व विकासप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमितजी शहा, भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीनजी नबीन यांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम बंगाल, पुद्देचेरी, आसाम राज्यामध्ये चुरशीच्या व रंगतदार निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे बहुमताने सरकार स्थापन होणार आहे.

देशामध्ये ऐतिहासिक यशाचा आणि दणदणीत विजयाचा भव्य जल्लोष करण्याकरता भारतीय जनता पार्टीचे प्रदेश चिटणीस तथा माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार मा. आमदार राम सातपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार दि. 04/05/2026 रोजी माळशिरस तालुक्यातील अकलूज येथील सदुभाऊ चौक येथे सायंकाळी 04.30 वाजता विजयाचा महाजल्लोष कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पार्टी माळशिरस तालुक्यातील नेते, कार्यकर्ते यांच्यावतीने करण्यात आलेले आहे…

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button