ताज्या बातम्याराजकारणसामाजिक

लोकशाहीर साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांची जयंती भाजप व वीर फकिरा ग्रुप, अकलूज यांच्या वतीने सामाजिक उपक्रमांनी साजरी होणार…

माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार मा. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार…

सर्व जाती धर्मातील ५१ गरजू कुटुंबांना पन्हाळी पत्रे वाटप कार्यक्रम होणार…

अकलूज (बारामती झटका)

लोकशाहीर साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांची जयंती भाजप व वीर फकिरा ग्रुप, अकलूज यांच्या वतीने शनिवार दि. १/८/२०२६ रोजी सकाळी १० वा. सदुभाऊ चौक, अकलूज, ता. माळशिरस येथे सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात येणार आहे. यावेळी ५१ गरजू कुटुंबांना पन्हाळी पत्रे वाटप करण्यात येणार आहेत.

माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार मा. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्यासह मा.श्री. प्रकाशबापु पाटील अध्यक्ष, श्रीराम शिक्षण संस्था, मा.श्री. आप्पासाहेब देशमुख मा. नगराध्यक्ष, नगरपंचायत माळशिरस, मा.श्री. बाजीराव काटकर जिल्हाउपाध्यक्ष, भाजपा, मा. श्री. सोपान काका नारनवर ज्येष्ठ नेते, भाजपा, मा. श्री. सुजयसिंह माने-पाटील अकलूज मंडल अध्यक्ष, भाजपा, मा.श्री. सचिन शिंदे सोलापूर जिल्हा सरचिटणीस, भाजपा, मा. सौ. ज्योतीदेवी माने-पाटील मा. सदस्य, ग्रामपंचायत अकलूज, मा. सौ. दिपालीताई वाघमोडे नगरसेविका, अकलूज नगरपरिषद, मा.श्री. राहुल लोंढे गटनेते तथा नगरसेवक, अकलूज नगरपरिषद, मा. सौ. जयश्रीताई एकतपुरे नगरसेविका, अकलूज नगरपरिषद, मा.श्री. महेश शिंदे नगरसेवक, अकलूज नगरपरिषद, मा. सौ. दिपालीताई देशमुख सोलापूर जिल्हा महिला सरचिटणीस, भाजपा, मा.श्री. संजय दोशी (भांबुर्डीकर) मा. शहर अध्यक्ष, भाजपा, मा. श्री. अजित गांधी भाजपा नेते, मा.श्री.डॉ. निलेश ननवरे तालुका संघटक, भाजपा, मा.श्री. शाखाभाऊ कर्चे कार्यकर्ते, भाजपा आदी मान्यवर असणार आहेत.

तरी अकलूज परिसरातील सर्व नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button