निषेध! निषेध! तीव्र निषेध!वाचाळवीर संजय राऊत यांनी वापरलेली अत्यंत खालच्या पातळीची भाषेचा जाहीर निषेध….

महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्याबद्दल वाचाळवीर संजय राऊत यांच्या जाहीर निषेधाचे आंदोलन अकलूज येथे होणार….
अकलूज (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष लाडके पालकमंत्री ना. श्री. जयकुमार गोरे उर्फ जयाभाऊ यांच्याबद्दल वाचाळवीर संजय राऊत यांनी वापरलेली अत्यंत खालच्या पातळीची भाषा आणि केलेली शिवीगाळ अत्यंत संतापजनक आहे. या निंदनीय कृत्याचा भारतीय जनता पार्टी, अकलूज शहरच्या वतीने जाहीर आणि तीव्र निषेध करण्यात येत आहे, असा भारतीय जनता पार्टीचे अकलूज शहराध्यक्ष महादेवरावजी कावळे यांनी जाहीर निषेध व्यक्त केला आहे..
वाचाळविर संजय राऊत यांच्या अरेरावी विरोधात आपल्या सर्वांचा तीव्र संताप व्यक्त करण्यासाठी आणि ताकदीने निषेध नोंदवण्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहणे अनिवार्य आहे.
आंदोलनाची सभेची ठिकाण व वेळ : दि. २ ऑगस्ट २०२६ रोजी, वेळ : सायंकाळी ठीक ५:०० वा., ठिकाण : सदुभाऊ चौक, अकलूज, ता. माळशिरस, निवेदक : महादेव नाना कावळे
(भारतीय जनता पार्टी, अकलूज शहर)
सर्व भारतीय जनता पार्टी, अकलूज शहर पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आलेले आहे…
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



