ताज्या बातम्याराजकारण

मा. आमदार राम सातपुते यांची अकलूज येथील भाजपचे निष्ठावान व कट्टर नेते संजय दोशी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट..

सहकार महर्षी यांचा पराभव करणारे स्व. शामराव पाटील यांचे शिलेदार ॲड. संजय दोशी भांबुर्डीकर यांच्या जयकोट ट्रेडर्स, अकलूज येथे सदिच्छा भेट…

अकलूज (बारामती झटका)

भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस तथा माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांनी सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांचा पराभव करणारे स्वर्गीय शामराव पाटील यांचे विश्वासू शिलेदार ॲड. संजय जयकुमार दोशी यांच्या अकलूज येथील जयकोट ट्रेडर्सला सदिच्छा भेट दिली…

पश्चिम बंगाल, आसाम व पुद्देचेरी राज्यात भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमितजी शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीनजी नबीन यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी दैदीप्यमान यश संपादन केल्याबद्दल अकलूज येथील सदुभाऊ चौकामध्ये विजयाचा महाजल्लोष कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर ॲड. संजय दोशी यांनी निवासस्थानी सदिच्छा भेट देण्याचा आग्रह केलेला होता. त्यावेळी माजी आमदार राम सातपुते यांनी आवर्जून भाजपच्या निष्ठावान व कट्टर समर्थक असणारे भांबुर्डीकर परिवार यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी ॲड. संजय जयकुमार दोशी, प्रतीक संजय जोशी, अकलूज शहराध्यक्ष महादेवरावजी कावळे, जिल्हा ग्रामीण सरचिटणीस सचिनजी शिंदे आदी उपस्थित होते. माजी आमदार राम सातपुते यांचा भांबुर्डीकर यांच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला…

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button