उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची शिवसेना सोलापूर जिल्हाध्यक्ष सुमितभाऊ जानकर यांनी सदिच्छा भेट घेतली….

साहेबांकडे मांडलेल्या अडचणी व प्रश्न लक्षपूर्वक ऐकून तात्काळ मार्गी लावत असतात शिवसेना जिल्हाध्यक्ष सुमितभाऊ जानकर
मुंबई (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे सर्वेसर्वा एकनाथजी शिंदे साहेब यांची भेट घेऊन श्री. सुमितभाऊ जिजाबा जानकर यांची शिवसेना, सोलापूर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती होताच सामाजिक कार्याला व समाजसेवेला सुरुवात केलेली आहे. ग्रामीण भागातील शिक्षण व अनेक समस्या घेऊन शासन दरबारी पाठपुरावा करण्याचे काम सुरू झालेले आहे..

ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेच्या जनहितार्थ कार्याला सुरुवात केलेली आहे.
याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांची भेट घेऊन शिक्षण विभागाशी संबंधित प्रलंबित विषय व येणाऱ्या अडचणींबाबत व अनेक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
आपल्या समाजसेवेच्या वृत्तीला साजेसं काम तात्काळ सुरू केलं. सुमितभाऊंनी मांडलेले प्रश्न लक्षपूर्वक ऐकताच शिंदे साहेबांनी तत्काळ संबंधित शिक्षण विभाग अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देत न्याय मिळवून देण्याचे कार्य केले.

यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना जिल्हाध्यक्ष सुमितभाऊ जानकर म्हणाले की, “शिंदे साहेब हे केवळ एक राजकीय नेते नसून ते सर्वसामान्यांच्या भावना समजून घेणारे विद्यापीठ आहे. त्यांच्या अडचणींना स्वतःच्या कुटुंबाप्रमाणे जपणारे कुटुंबप्रमुख आहेत.”
समाजाच्या प्रश्नांवर तात्काळ निर्णय घेण्याची आणि जनतेला न्याय देण्याची ही कार्यपद्धती निश्चितच प्रेरणादायी आहे, अशा शिवसेना सोलापूर जिल्हा अध्यक्ष सुमितभाऊ जानकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या..

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



