ताज्या बातम्याविशेष

माढा तालुक्यातील भुताष्टे येथे कायदेविषयक शिबीर संपन्न

लऊळ (बारामती झटका)

माढा तालुका विधी सेवा समिती व वकिल संघ माढा यांचे संयुक्त विद्यमाने भुताष्टे ता. माढा येथे आज रोजी कायदेशिविषयक शिबिर श्री. जी. व्ही गांधे साहेब सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर माढा यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

भुताष्टे (ता. माढा) ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जेष्ठ नागरिकांसाठीचे कायदे, बालकांविषयी कायदे, तसेच महिलांविषयी असणाऱ्या कायद्यांविषयीचे शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ॲड. विशाल सक्री बालकांविषयी कायदे, ॲड. एस. एस. जगताप महिलांचे हक्क व अधिकार, अ‍ॅड. आशुतोष धुमाळ यांनी जेष्ठ नागरिकांविषयी कायदे तर अध्यक्ष आनंद कुलकर्णी यांनी रोजच्या दैनंदिन जीवनात कायद्याची आवश्यकता यावर मार्गदर्शन केले. तसेच न्यायाधीश जी. व्ही. गांधे साहेब यांनी विधी सेवा समिती व त्यातून नागरिकांना मिळणाऱ्या सुविधा व त्यांचे महत्व यावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते सागर (भाऊ) यादव यांचे सहकार्य लाभले.

सदर कार्यक्रमासाठी ॲड. श्रीकृष्ण भोसले, ॲड. राधा चवरे, ॲड. मिलींदकुमार लोंढे, ॲड. ठोसर तसेच भुताष्टे गावचे सरपंच प्रतिनिधी सुरेश यादव, माजी सरपंच दिलीप यादव, हनुमंत यादव, अमोल यादव, पोपट यादव, सुधीर यादव, संभाजी पाटील, ज्ञानेश्वर पाटील, ज्ञानेश्वर सलगर, पोलीस पाटील सतीश यादव, अनिल यादव, माढा पोलीस स्टेशनचे कर्मचारी भोगे व बनसोडे तसेच आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक टोणपे, महिला भगिनी व ग्रामस्थ तसेच न्यायालयातील इतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ॲड. रत्नप्रभा जगदाळे यांनी केले तर आभार ॲड. रणजीत पाटील यांनी केले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

  1. I found this article both enjoyable and educational. The insights were compelling and well-articulated. Let’s dive deeper into this subject. Check out my profile for more discussions!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button