ताज्या बातम्या

महाराष्ट्र केसरी पै. सिकंदर शेख याचे माळशिरस तालुक्यात जंगी स्वागत करण्यात आले.

नातेपुते (बारामती झटका)

महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेख पिंपरी येथील यात्रेनिमित्त कुस्तीसाठी माळशिरस तालुक्यात पहिल्यांदाच आलेले होते. कुस्ती क्षेत्रातील जुने मित्र माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती युवा नेते पैलवान किशोरभैय्या शिवाजीराव सुळ पाटील यांच्या शिंगणापूर पाटी नजीक असणाऱ्या पेट्रोल पंपावर आवर्जून सदिच्छा भेट दिली. यावेळी माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती युवा नेते पैलवान किशोरभैय्या शिवाजीराव सुळ पाटील यांनी महाराष्ट्र केसरी झालेल्या मित्राचा सन्मान केला. यावेळी माळशिरस तालुक्याचे ज्येष्ठ नेते अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती गणपततात्या वाघमोडे, पै. विठ्ठल अर्जुन, श्री. महेश सूळ आदी मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेख आणि उपसभापती पैलवान किशोरभैय्या सुळ पाटील यांची तालमीमधील मैत्री आहे. दोघांच्या अनेकवेळा भेटीगाठी झालेल्या आहेत. मात्र, यावेळची भेट वेगळी होती. महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर पहिल्यांदाच पैलवान सिकंदर शेख यांचे आगमन माळशिरस तालुक्यात झालेले असल्याने तालुक्याच्यावतीने जिवलग मित्राचा सन्मान पंढरपूर वरून खास पवित्र तुळशीच्या माळेचा आणलेला हार घालून, मानाचा फेटा बांधून, श्रीफळ देऊन करण्यात आला.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button