ताज्या बातम्यासामाजिक

मल्हार साखर कारखान्याच्या वतीने माळशिरसचे नूतन नगराध्यक्ष रघुनाथ चव्हाण यांचा सन्मान संपन्न झाला….

माळशिरस नगरपंचायतीचे 13वे बिनविरोध नगराध्यक्ष होण्याचा रामोशी समाजाचे रघुनाथ चव्हाण यांना बहुमान मिळाला…

माळशिरस (बारामती झटका)

मल्हार साखर कारखाना लिमिटेड चांदापुरी ता. माळशिरस कारखान्याचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर श्री. प्रितमसिंह काशिनाथ देवकाते पाटील यांनी माळशिरस येथील हिमालय निवासस्थानी माळशिरस नगरपंचायतीचे बिनविरोध नगराध्यक्ष रघुनाथ चव्हाण यांचा शाल, फेटा, हार व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर बबनराव देवकाते पाटील, माळशिरस नगरपंचायतीचे विद्यमान नगरसेवक महादेवराव कोळेकर, नंदीवाले समाज महाराष्ट्र राज्य संघटक मारुती वाघमोडे, बारामती झटका संपादक श्रीनिवास कदम पाटील उपस्थित होते…

माळशिरस नगरपंचायतीचे 13 वे बिनविरोध नगराध्यक्ष होण्याचा रामोशी समाजाचे रघुनाथ चव्हाण यांना बहुमान मिळालेला आहे. प्रतिकूल परिस्थितीत राजकारण व समाजकारण करीत असताना सर्व क्षेत्रातील लोकांशी जिव्हाळ्याचे व मित्रत्वाचे नाते जपलेले आहे. बिनविरोध नगराध्यक्ष होण्याचा बहुमान मिळालेला असल्याने त्यांचा सर्व स्तरातून गुणगौरव व सत्कार होत आहे. मल्हार साखर कारखान्याचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर प्रितमसिंह देवकाते पाटील यांनी सन्मान करून मैत्रीचे नाते दृढ केलेले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button