मळोली गावचे प्रगतशील बागायतदार निवृत्ती रामहरी जाधव पाटील यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन..

मळोली गावचे माजी पोलीस पाटील व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग उर्फ आप्पासाहेब जाधव पाटील यांना पितृशोक..
मळोली (बारामती झटका)
मळोली, ता. माळशिरस गावचे प्रगतशील बागायतदार निवृत्ती रामहरी जाधव पाटील उर्फ नेवाबापू यांचे शनिवार दि. 10/10/2026 रोजी वयाच्या 93 व्या वर्षी वार्धक्याने दुःखद निधन झालेले आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, चार मुली, सुना, जावई, नातवंडे, परतवंडे असा परिवार आहे. मळोली गावचे माजी पोलीस पाटील व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य श्री. पांडुरंग उर्फ आप्पासाहेब पाटील व श्री. विठ्ठल जाधव पाटील यांचे ते वडील होते. त्यांच्यावर आजच दुपारी तीन नंतर मळोली गावातील वैकुंठ स्मशानभूमी येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत..
बापूंचा स्वभाव मनमिळावू व कष्टाळू होते. बापू व स्वर्गीय निलावती अक्का या उभय पती-पत्नींनी प्रतिकूल परिस्थितीत आपल्या शेतामध्ये काबाडकष्ट करून मुलांचे शिक्षण व लग्न लावलेले आहेत. बापू आणि अक्का यांनी कष्टाच्या जीवावर दरिद्री संसाराचा स्वर्ग बनवलेला आहे.
कर्तुत्ववान पांडुरंग व विठ्ठल यांनीही आपल्या आई-वडिलांच्या संस्कारावर काबाडकष्ट करून प्रपंचा नेटका केलेला आहे. त्यांचे अध्यात्मिक घराणे आहे. आज सुद्धा चौथ्या पिढीत त्यांच्या घरातील लोकांच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीच्या माळा आहेत. बापू कपाळावरील गंध कधीही पुसून देत नव्हते. बापूंनी शेतीबरोबर गुरांचेही संगोपन चांगल्या पद्धतीने केलेले आहे. आज सुद्धा त्यांच्या घरासमोर गाई म्हशीचा गोठा आहे.
बापू गावामध्ये सुखदुःखाच्या कार्यक्रमाशिवाय कधीही वायफट वेळ घालवत नव्हते. कायम आपल्या शेतामध्ये राबत असत.
बापूंच्या जाण्याने जाधव पाटील परिवार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. जाधव पाटील परिवार यांना दुःखातून सावरण्याचे ईश्वर बळ देवो आणि बापूंच्या आत्म्याला शांती लाभो हीच बारामती झटका परिवार यांचे कडून भावपूर्ण आदरांजली आहे…
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



