ताज्या बातम्याराजकारणसामाजिक

सदाशिवनगर रत्नत्रय पतसंस्थेची तक्रार मागे घेण्यासाठी धमकी व शिवीगाळ करणाऱ्या प्रमोद दोशी व सोमनाथ राऊत यांच्यावर एनसी दाखल

बनावट सह्या व खोटी कागदपत्रे बनवून परस्पर लाखो रुपयांचे कर्ज उचलून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी दीपक गोरे यांची तक्रार…

माळशिरस (बारामती झटका)

रत्नत्रय ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित सदाशिवनगर, ता. माळशिरस संस्थेचे सचिव ज्ञानदेव उर्फ ज्ञानेश पांडुरंग राऊत संस्थेचे चेअरमन व संचालक मंडळ यांच्या विरोधात दीपक रामचंद्र गोरे रा. सदाशिवनगर यांनी तक्रार दिलेली होती. सदर तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने सचिव ज्ञानदेव उर्फ ज्ञानेश राऊत यांना माळशिरस पोलीस यांनी अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता पाच दिवसांची पोलीस कस्टडी मिळालेली आहे. पोलीस कस्टडीमध्ये पतसंस्थेचे बिंग फुटू नये, यासाठी पतसंस्थेचे संबंधित हितचिंतक प्रमोद आनंतलाल दोशी व सोमनाथ रामचंद्र राऊत यांनी तक्रारदार दिपक गोरे यांना धमकी व शिवीगाळ करून तक्रार मागे घे, नाहीतर काय खरं नाही असे म्हणाले असल्याने दीपक गोरे यांनी माळशिरस पोलीस स्टेशन येथे प्रमोद दोशी व सोमनाथ राऊत यांच्यावर एनसी दाखल केलेली आहे. यामुळे रत्नत्रय पतसंस्थेच्या बनावट सह्या व खोटी कागदपत्रे बनवून परस्पर लाखो रुपयाचे कर्ज उचलून आर्थिक फसवणूक केल्याच्या तक्रारीने वेगळे वळण घेतलेले आहे…

तक्रारदार दीपक गोरे यांनी दिलेल्या तक्रारी मधील हकीगत अशी, रत्नत्रय ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. सदाशिवनगर, ता. माळशिरस संस्थेचे सचिव ज्ञानदेव पांडुरंग राऊत संस्थेचे चेअरमन व सर्व संचालक यांच्या विरोधात संगनमताने बनावट सह्या व खोटी कागदपत्रे बनवून परस्पर लाखो रुपयांचे कर्ज उचलून आर्थिक फसवणूक केल्याबाबत तसेच खाजगी सावकार सोहम शामराव भगत, सागर जयराम उरवणे, प्रीतम शशिकांत दोशी, रामदास बबन गोफणे, कविता राहुल भगत, सुभाष विठ्ठल सुज्ञे, सर्व. रा. सदाशिवनगर ता. माळशिरस यांच्या विरुद्ध अवैध सावकारी करणे, ज्यादा वसुलीसाठी धमकावणे व जागा हडप करणे अशी दीपक रामचंद्र गोरे रा. सदाशिवनगर यांनी दिलेल्या तक्रारीवरून माळशिरस पोलीस स्टेशन येथे FIR नंबर 0493 गुन्हा नोंद झालेला आहे.

सदरच्या गुन्ह्यात भारतीय दंड संहिता 1860 कलम 420, 417, 406, 465 ,468, 471, 506, 34, महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 2014 कलम 39, 41, 45 कलमाअन्वये गुन्हा नोंद झालेला होता.

माळशिरस पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद झालेला असून गुन्ह्यामधील मास्टर माईंड रत्नत्रय पतसंस्थेचे सचिव ज्ञानदेव उर्फ ज्ञानेश राऊत यांना माळशिरस पोलीसांनी अटक मेहरबान न्यायालयाने गंभीर गुन्ह्याच्या अनुषंगाने पुढील तपास करण्याकरता पाच दिवसांची पोलीस कस्टडी देण्यात आलेली होती.

सदर गुन्ह्याचा तपास माळशिरस पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस उपविभागीय अधिकारी श्री. विशाल नवले करीत आहेत. त्यामुळे प्रकरणाच्या मुळाशी जाऊनच तपास होणार आहे.

संस्थेचे चेअरमन व सर्व संचालकांसह खाजगी सावकार यांची शोध मोहीम सुरू आहे. पतसंस्थेचे सचिव जेवढे जबाबदार तेवढेच चेअरमन व संचालक मंडळ जबाबदार असते. तपास अधिकारी पोलीस उप विभागीय अधिकारी श्री. विशाल नवले यांच्याशी संपर्क साधून चेअरमन यांची शोध मोहीम सुरू आहे का ? नाही ? सविस्तर बातमी पुढील भागात….

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button