मळोली गावचे थोर सुपुत्र चंद्रकांत जाधव यांच्या रूपाने पहिल्यांदाच जिल्हा परिषदेवर प्रतिनिधित्व करण्याची संधी….

मळोली गावचे स्वाभिमानी नेतृत्व चंद्रकांत जाधव यांचा आवाज सर्वसामान्य व गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठी जिल्हा परिषद सभागृहात घुमणार…
मळोली (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यात मोहिते पाटील जानकर गटासोबत महायुती सरकारमधील राष्ट्रवादी अजितदादा गट, शिवसेना एकनाथ शिंदे गट, आरपीआय आठवले गट या पक्षांसह अनेक छोटे-मोठे पक्ष व संघटना एकत्र येऊन भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये निवडणूक पार पडलेली आहे. माळशिरस तालुक्याच्या इतिहासात पूर्व भागामध्ये पिलीव जिल्हा परिषद गटात मळोली गावचे माजी उपसरपंच चंद्रकांत ज्ञानेश्वर जाधव यांच्या रूपाने जिल्हा परिषद मध्ये पहिल्यांदा मळोली गावचा चंद्रकांत जाधव यांच्या रूपाने सूर्य उगवला आहे.

महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे, माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आरोग्यदूत माजी आमदार राम सातपुते यांची राजकीय रणनीती यशस्वी ठरलेली आहे. मळोली गावचे थोर सुपुत्र चंद्रकांत ज्ञानेश्वर जाधव यांच्या रूपाने पहिल्यांदाच जिल्हा परिषदेवर प्रतिनिधित्व करण्याची संधी मळोली गावाला मिळालेली आहे. मळोली गावचे स्वाभिमानी नेतृत्व चंद्रकांत जाधव यांचा आवाज सर्वसामान्य व गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठी जिल्हा परिषद सभागृहात घुमणार आहे..


चंद्रकांत जाधव यांनी मळोली गावच्या उपसरपंच पदाची धुरा चांगल्या पद्धतीने सांभाळलेली होती. त्यावेळेस सर्वसामान्य व गोरगरीब जनतेची कामे केलेली होती. शिवशंकर सोसायटीच्या माध्यमातून शेतकरी बांधवांसाठी आर्थिक सहकार्य करून शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ करण्याचे काम केलेले होते. गत निवडणुकीत निसटता पराभव झालेला होता तरीसुद्धा सर्वसामान्य व गोरगरीब जनतेसाठी अहोरात्र झटण्याचे काम सुरू होते. माजी आमदार राम सातपुते यांच्या सहकार्याने परिसरातील जनतेची कामे करण्याचे काम सुरू होते. माळशिरस तालुक्याच्या पूर्व भागातील पाण्याच्या प्रश्नासाठी धडपड सुरू होती. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी कडून जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी मिळालेली होती.

गत पंचायत समितीला रणजीतसिंह जयसिंगराव जाधव यांच्याकडून पराभव झालेला होता. योगायोगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून रणजीतसिंह जाधव यांनाच उमेदवारी मिळालेली होती. पुन्हा पिलीव जिल्हा परिषद गटात रणजीतसिंह जाधव व चंद्रकांत जाधव यांच्यात लढत झालेली होती. गेल्या निवडणुकीत मळोली गावातून रणजीतसिंह जाधव यांना मताधिक्य मिळालेले होते. मात्र, या निवडणुकीत चंद्रकांत जाधव यांनी मताधिक्य घेतलेले आहे. पिलीव जिल्हा परिषद गटातील पिलीव, सुळेवाडी, बचेरी, काळमवाडी, शिंगोर्णी, कोळेगाव, फळवणी, तांदुळवाडी, मळोली, साळमुखवाडी या गावांचा समावेश होता. सर्वच गावांनी चंद्रकांत जाधव यांच्या कार्यामुळे व मनमिळावू स्वभावामुळे मतदान केलेले आहे.

विधानसभेच्या निवडणुकीत पूर्व भागातील मतदान भारतीय जनता पार्टीला कमी झालेले होते. मात्र, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपच्या मतदानात वाढ झालेली आहे. पिलीव जिल्हा परिषद गटात चंद्रकांत जाधव व पिलीव पंचायत समिती गणात सौ. नम्रता शिवराज पुकळे यांच्यामुळे भविष्यात भारतीय जनता पार्टीची ताकद वाढणार आहे.
मळोली गावाला पहिल्यांदाच जिल्हा परिषदेमध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी चंद्रकांत जाधव यांच्या रूपाने मिळालेली आहे. यापूर्वी पंचायत समिती सभागृहात लालासाहेब जाधव पाटील, वत्सला ढेंबरे, मंदाकिनी ढेंबरे, रणजीतसिंह जाधव यांनी प्रतिनिधित्व केलेले आहे. मळोली गावचे स्वाभिमानी नेतृत्व चंद्रकांत ज्ञानेश्वर जाधव यांचा आवाज सर्वसामान्य व गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठी जिल्हा परिषद सभागृहात घुमणार आहे…

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



